Gadar 2 Collection: सनी देओलचा ‘गदर 2’ तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर थंडावला, केली ड्रीम गर्ल 2 पेक्षा कमी कमाई


सनी देओलच्या ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर असा धुमाकूळ घातला की शाहरुख खानही हादरला. 22 वर्षांनंतर ‘गदर 2’ ने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले. गेल्या 17 दिवसांपासून चित्रपटाने चांगली कमाई केली होती, मात्र आता 18 आणि 19 व्या दिवशी गदर 2 च्या कमाईचा वेग मंदावला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 ने तिसऱ्या आठवड्यात खूपच कमी कमाई केली आहे, तर या आठवड्यात रिलीज झालेल्या आयुष्मान खुरानाचा चित्रपट ड्रीम गर्ल 2 ला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सनी देओलचा ‘गदर 2’ हा सर्वात जलद 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे. दुसरीकडे, गदर 2 ने दुसऱ्या वीकेंडलाही बंपर कमाई करून इतिहास रचला, पण आता तिसऱ्या आठवड्यात गदर 2 ची क्रेझ थोडी कमी झाली आहे. वीकेंडला 16 कोटींची कमाई करणाऱ्या गदर 2 ने रिलीजच्या 19व्या दिवशी 5.10 कोटींची कमाई केली आहे. भारतातील गदर 2 ची एकूण कमाई 465.75 कोटींवर पोहोचली आहे.

दुसरीकडे, आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 बद्दल बोलायचे झाले, तर चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या वीकेंडला खर्चापेक्षा जास्त कमाई केली होती. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ड्रीमगर्ल 2 ने रिलीजच्या 5 व्या दिवशी सुमारे 5.70 कोटींची कमाई केली आहे, जो मिड-बजेट चित्रपटासाठी चांगला आकडा आहे. अशा प्रकारे ड्रीमगर्ल 2 ने 5 दिवसात 51.83 कमाई केली आहे. चित्रपटाचे जागतिक कलेक्शन 62.5 कोटींवर पोहोचले आहे.

गदर 2 सोबत अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तारा सिंगच्या वादळात OMG 2 कुठे गायब झाला हे कळले नाही. जरी OMG 2 ने चांगले कलेक्शन केले असले तरी चाहत्यांमध्ये गदर 2 ची प्रचंड क्रेझ होती. पुढच्या आठवड्यात अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तो चांगलाच फसला. आता भारतात 450 कोटींचा आकडा यशस्वीपणे पार केल्यानंतर, आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने गदर 2 च्या कमाईवर परिणाम केला आहे. कॉमेडीने भरलेला ड्रीमगर्ल 2 चित्रपटाच्या हिशोबानुसार चांगले कलेक्शन करत आहे.