मोदी सरकारने उघडला नोकऱ्यांचा खजिना, 51 हजार तरुणांना लागली लॉटरी; मिळाले नियुक्ती पत्र


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. भारताचा लवकरच टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होणार आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांनी या युवकांना जॉइनिंग लेटर दिले. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले. रोजगार मेळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालय, CRPF, BSF, सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स, CISF, ITBP आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसह दिल्ली पोलिसांमध्येही भरती करण्यात आली आहे.

22 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. 2023 च्या अखेरीस 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे. पीएम मोदींनी गेल्या 9 महिन्यांत 7 रोजगार मेळाव्यांमध्ये 4 लाख 48 हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित रोजगार मेळाव्यात या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल, पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की एकट्या पर्यटन क्षेत्राने 2030 पर्यंत अर्थव्यवस्थेत 20 लाख कोटी रुपयांचे योगदान देणे अपेक्षित आहे आणि 13-14 कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.