22 वर्षांनंतर सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर त्सुनामीच्या रुपात परतला आहे. गदर 2 रिलीजसोबतच जबरदस्त कमाई करत आहे. सनी देओलच्या गदर 2 ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खान आणि सलमान खानलाही मागे टाकले आहे. दुसऱ्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत गदर 2 शाहरुख खानच्या पठाणच्याही पुढे गेला. रिलीजच्या 11व्या दिवशीही गदर 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Gadar 2 Collection : 22 वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा चित्रपट ठरला सर्वात मोठी त्सुनामी
सनी देओलच्या गदर 2 ने 11व्या दिवशी जवळपास 14 कोटींची कमाई केली आहे. तथापि, हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत. यासह, भारतातील गदर 2 चे निव्वळ कलेक्शन 389.10 कोटींवर गेले आहे. त्याचबरोबर गदर 2 चे जागतिक कलेक्शन 487 कोटींवर पोहोचले आहे, जे पाहता लवकरच गदर 2 जगभरात 500 कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास आहे.
गदर 2 ने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी जोरदार कमाई करत वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पठाणला मागे सोडले. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने दुसऱ्या आठवड्यात एकूण 46 कोटी, तर ‘गदर 2’ने दुसऱ्या आठवड्यात 92.07 कोटींचे कलेक्शन केले. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी पठाणने 13.50 कोटी तर गदर 2 ने 40.50 कोटींची कमाई केली.
सनी देओल बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटाच्या शोधात होता. गदर 2 आता सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सनी देओलच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट ठरला होता. गदर 2 ने मोठ्या पडद्यावर प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या अमिषा पटेललाही हिट केले. तारा सिंग आणि सकिना यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. मात्र, दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माचा अभिनय चाहत्यांना फारसा प्रभावित करू शकला नाही.