शाहरुख-करणने बॉलीवूडला बर्बाद केले…भडकला विवेक अग्निहोत्री


‘द कश्मीर फाइल्स’ संदर्भात वादात सापडलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्याच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री अशा दिग्दर्शकांपैकी एक आहे जे प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडतात. मात्र, यामुळे तो अनेकदा वादातही सापडला आहे. आता विवेक अग्निहोत्रीने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला आहे.

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, शाहरुख खान आणि करण जोहरसारख्या लोकांनी निराश केले आहे. ‘या लोकांनी भारतातील खऱ्या गोष्टी सिनेमातून काढून टाकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत अग्निहोत्री म्हणाले की, शहेनशाह आणि दीवार यांसारख्या चित्रपटांनंतर खऱ्या कथा चित्रपटांमधून गायब झाल्या आहेत. विशेषत: करण जोहर आणि शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीचे बरेच नुकसान झाले आहे.

करण जोहरवर बॉलिवूडमधील स्टारडमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, करण जोहरनेच बॉलिवूडमध्ये राजकारण, स्टारडम आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले आहे. त्याने चांगले चित्रपट बनवले नाहीत असे नाही, तर तो स्टार सिस्टिमला प्रोत्साहन देत आहे. तो 8 वर्षाच्या मुलासाठी चित्रपट का बनवू शकत नाहीत. त्यांना हिंदी भाषिक, भारतीय रॉ आणि तळागाळातील टॅलेंट का पुढे यावे असे वाटत नाही?

विवेक म्हणाला की, असे काही लोक आहेत जे केवळ त्यांच्या स्टारडमसाठी काम करतात. हे लोक चित्रपट निर्माते अजिबात नाहीत. सामान्य बॉलीवूड व्यवस्थेत, लोकांना सिनेमाची आवड नसते, ते फक्त पैसे आणि त्यांच्या स्टारडमसाठी काम करतात. मी शाहरुख खानचा फॅन आहे, पण तो ज्या प्रकारचे राजकारण बॉलीवूडमध्ये करतोय, त्यामुळे सिनेसृष्टीची नासधूस होत आहे.

एकेकाळी डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या विवेक अग्निहोत्रीचा दृष्टिकोन आता खूप बदलला आहे. आता त्यांची विचारसरणी आणि विचारधाराही बदलली आहे. एकेकाळी चॉकलेट, हेट स्टोरी आणि धना धन गोल सारखे चित्रपट बनवणारा विवेक अग्निहोत्री आता हार्ड हिटिंग सिनेमाकडे वाटचाल करत आहे. ते म्हणतात की भारतातील छोट्या शहरांमध्ये अशा सत्यकथा आहेत की आपल्याला कथांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही.