Seema Haider Movie : 20 ऑगस्टला रिलीज होणार सीमा हैदरवर बनत असलेल्या चित्रपटाचे पहिले गाणे, समोर आले पोस्टर


पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या देशभरात चर्चा आहे. सीमा हैदर सर्वत्र दिसत आहे. आता सीमा हैदरवरही एक चित्रपट बनत आहे, ज्याचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केले आहे. याशिवाय चित्रपटाचे पहिले गाणेही तयार करण्यात आले आहे, जे दोन दिवसांनी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सीमा हैदर आणि नोएडातील सचिन मीना यांच्या प्रेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. निर्माता अमित जानी ही कथा पडद्यावर दाखवणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री फरहीन फालक सीमा हैदरच्या भूमिकेत दिसणार आहे. भरत सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

सीमा हैदरच्या कराची टू नोएडा या चित्रपटातील पहिले गाणे 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वतः निर्माता अमित जानी यांनी ट्विटरवर याचे पोस्टर जारी करून याची घोषणा केली आहे. हे गाणे प्रीती सरोज हिने गायले असून निर्माते अमित जानी यांनी गीते लिहिली आहेत. हा चित्रपट जानी फायरफॉक्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे.


कराची ते नोएडा या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये सीमा हैदरचे तीन लूक दाखवण्यात आले आहेत. अभिनेत्री फरहीन फालकचा लूक सीमा हैदरसारखा दिसतो. एका लूकमध्ये ती हिजाबमध्ये दिसत आहे. दुसऱ्या लूकमध्ये केस मोकळे असून चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्रास दिसत आहे, तर तिसऱ्या लूकमध्ये सीमा हैदर साडीत दिसत आहे. तिच्या डोक्यावर साडीचा पदर आहे आणि कपाळावर कुंकूही आहे.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी खूप अनोखी आहे. पाकिस्तानच्या कराची येथील सीमा हैदर आणि राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडाचा सचिन मीना मोबाईल फोनवर PUBG गेम खेळताना प्रेमात पडले. दोघांचे प्रेम इतके वाढले की चार मुलांची आई सीमा हैदर सर्व काही सोडून पाकिस्तानातून छुप्या पद्धतीने भारतात आली आणि सचिनसोबत राहू लागली. मात्र हे गुपित उघड झाल्यावर खळबळ उडाली. सीमा आणि सचिन कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. आता या दोघांवर चित्रपटही बनत आहे.