चांद्रयान-3 ने पाठवला आणखी एक सुंदर व्हिडीओ, तुम्ही कधीच इतक्या जवळून पाहिला नसेल चंद्र


भारताच्या मिशन मून चांद्रयान-3 ने शुक्रवारी चंद्राचा व्हिडिओ पाठवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. जो 15 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. व्हिडिओमध्ये चंद्रावरील खड्डे दिसत आहेत. इस्रोने व्हिडिओ ट्विट करून लिहिले, लँडरच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ पाठवला आहे. लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने 15 ऑगस्ट 2023 रोजी हा व्हिडिओ कॅप्चर केला.


दरम्यान, चांद्रयान-3 ने शुक्रवारी आणखी एक टप्पा पार केला. लँडर मॉड्यूलने डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. यानंतर त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी इतकी कमी करण्यात आली. इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली आहे. दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता होईल.