ग्राहक हक्क दिन दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आठवण करून देतो. असे असूनही अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीवही नाही, तर काही ग्राहक असे आहेत की ज्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव आहे, परंतु दुकानदार किंवा कंपनीने फसवणूक केल्यास ऑनलाइन तक्रार कशी करावी हेच कळत नाही.
जागो ग्राहक जागो ! दुकानदार किंवा कंपनीने केली गडबड, अशा प्रकारे ग्राहक न्यायालयात ऑनलाइन करा तक्रार
सरकारने सर्वसामान्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि लोकांना तासन्तास लांब रांगेत उभे राहण्यापासून वाचवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार केले आहेत, जिथे तुम्ही तुमची तक्रार ऑनलाइन नोंदवू शकता. जर कोणत्याही दुकानदाराने किंवा कंपनीने तुमच्यासोबत काही गडबड केली असेल, परंतु तुम्हाला काय करावे आणि तुमची तक्रार ऑनलाइन कशी नोंदवावी, हे समजत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याचे तुम्ही पालन करून ग्राहक न्यायालयात तुम्ही तुमची तक्रार एका क्षणात ऑनलाइन नोंदवू शकाल.
अशा प्रकारे ऑनलाइन नोंदवा तक्रार
- सर्वप्रथम, तुम्हाला https://consumerhelpline.gov.in/ ला भेट देऊन साइन-अप करावे लागेल, तुम्ही मोबाइल नंबर-OTP किंवा ईमेल आयडीद्वारे साइन-अप करू शकता.
- खाते साइन-इन केल्यानंतर, तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल
- या फॉर्ममध्ये तुम्हाला बिल क्रमांक, व्यवहार क्रमांक, बिल तारीख, उत्पादनाचे नाव, विक्रेत्याचे नाव टाकावे लागेल
- बिल आणि विक्रेत्याचे तपशील दिल्यानंतर, तुम्हाला आलेल्या समस्येचे वर्णन करा आणि नंतर सबमिट बटण दाबा
वर नमूद केलेल्या काही सोप्या चरणांचे अनुसरण करून ग्राहक न्यायालयात ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइलवर तक्रार क्रमांक मिळेल.
कसे तपासायचे तक्रारीचे स्टेट्स?
ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनात घुमत असेल की तक्रार नोंदवली गेली, पण आता पुढे काय? तक्रारीची स्थिती कशी जाणून घ्यावी? तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की https://consumerhelpline.gov.in/ वर भेट देऊन तुम्ही खात्यात साइन इन करून तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकता.