येणार आहेत आनंदाचे क्षण… भारताची चंद्रमोहिम होणार यशस्वी, चांद्रयान-3 ने केला शेवटच्या कक्षेत प्रवेश


चांद्रयान-3 साठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज शेवटच्या कक्षेत (153 किमी x 163 किमी) प्रवेश केला आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. 17 ऑगस्ट म्हणजेच उद्याचा दिवस चांद्रयान-3 साठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी इस्रो चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल. दरम्यान ISRO ने 14 ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा चांद्रयान-3 ची कक्षा कमी केली होती.


इस्रोने ट्विट केले की, चांद्रयान-3 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. यासह चंद्रबंधाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रोपल्शन मॉड्यूल तयार करण्याची वेळ आली आहे. लँडर मॉड्यूल त्यांच्या स्वतंत्र प्रवासासाठी तयार आहे. 17 ऑगस्ट रोजी, लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले जाईल.

चांद्रयानने पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा त्याची कक्षा 164 किमी x 18,074 किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. चांद्रयान-3 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते.