सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेल्या कमाईवर विराट कोहलीने तोडले मौन


विराट कोहलीचे खूप चाहते आहेत. तो मैदानात आणि मैदानाबाहेर खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडिया याचा पुरावा आहे. तो इंस्टाग्रामवर भारतातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू आहे. अलीकडेच सोशल मीडियावरून कोहलीच्या कमाईच्या बातम्या येत होत्या, ज्यावर आता भारताच्या दिग्गज फलंदाजाने मौन तोडले आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या आपल्या कमाईच्या बातम्या योग्य नसल्याचे कोहलीने म्हटले आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हॉपर हेडक्वार्टरच्या रिपोर्टचा हवाला देत, कोहलीला एका इंस्टाग्राम पोस्टवरून 11.45 कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात आले. कोहलीने हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्याने ट्विट करून या गोष्टीचा इन्कार केला आहे.

या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की कोहली इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा आशियाई आहे. यासोबतच तो इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर देखील आहे. या अहवालानुसार पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो हा इंस्टाग्रामवर एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणारा अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी नंबर-2 वर आहे. विराटनंतर या यादीत दुसरे नाव आहे, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे. प्रियांकाने एका इंस्टाग्राम पोस्टवरून 4.4 कोटी रुपये कमावले आहेत.

विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत गेला होता. कसोटी मालिका खेळल्यानंतर त्याने एकदिवसीय मालिकेतील फक्त एकच सामना खेळला आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला विश्रांती दिली. टी-20 मालिकेत तो टीम इंडियाचा भाग नसून सध्या ब्रेकवर आहे. या ब्रेकमध्ये तो आगामी दोन मोठ्या स्पर्धांसाठी स्वत:ला तयार करत आहे. भारताला 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते एकदिवसीय विश्वचषक, ज्याचे आयोजन भारत करत आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोहलीने आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसणे टीम इंडियासाठी आवश्यक आहे.