Gadar 2 vs OMG 2 : सनी देओलच्या गदरचा बॉक्स ऑफिसवर गदारोळ, पहिल्याच दिवशी केली अक्षय कुमारची सुट्टी


सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2’ आणि अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. 22 वर्षांनंतर येणाऱ्या गदर 2 बद्दल चाहत्यांना वेड लागले होते, ज्याचा परिणाम पहिल्याच दिवशी स्पष्टपणे दिसून आला. सनी देओलच्या एका गर्जनेवर थिएटरमध्ये पोहोचलेल्या चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि जोरदार जल्लोष केला. गदर 2 पहिल्या दिवशी हाऊसफुल्ल राहिला आणि चांगली कमाई करण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगले रेटिंग दिले आहे, परंतु ‘OMG 2’ पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ‘गदर 2’पेक्षा खूपच मागे आहे.

सौ सुनार की, एक लुहार की… सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर अशा प्रकारे धडकला की अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मागे टाकले. दिल्ली एनसीआर ते चेन्नईपर्यंत गदर 2 ची क्रेझ पाहायला मिळाली. गदर 2 कथेत दम नसला, तरी पण सनी देओलमध्ये अजूनही हिंमत आहे.

तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटाचा ‘गदर 2’ सिक्वेल आला आहे, ज्याबद्दल चाहत्यांची क्रेझ स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. आगाऊ बुकिंगमध्ये सनी देओलच्या गदर 2 ची 20 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

त्याचवेळी अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट देखील 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या कथेत ताकद आहे आणि चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची ओपनिंग खूपच कमी झाली असली तरी अक्षय कुमारचा OMG 2 पहिल्या दिवशी केवळ 9.5 कोटी कमवू शकला. माऊथ पब्लिसिटीचा फायदा चित्रपटाला मिळू शकतो.

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची दिल्ली एनसीआर, मुंबई, लखनऊ, भोपाळ आणि छोट्या शहरांमध्ये खूप क्रेझ आहे. 22 वर्षांनंतरही तारा सिंगसाठी चाहत्यांची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. वीकेंडला गदर 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 70-80 कोटींच्या पुढे जाऊ शकते, असा विश्वास आहे. दुसरीकडे, अक्षय कुमारच्या OMG 2 ला माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळू शकतो. वीकेंडला OMG 2 चे कलेक्शन 40 कोटींवर पोहोचू शकते.