सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर बनणार चित्रपट, सुरु झाले ‘कराची टू नोएडा’चे ऑडिशन्स


सध्या भारतात सीमा हैदरच्या चर्चा जोरात सुरू आहेत. पाकिस्तानातून पळून भारतात आलेली सीमा तिच्या प्रेमकथेमुळे सतत चर्चेत असते. सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमाबाबत काही लोक त्यांच्या समर्थनात आहेत, तर काही लोक त्यांच्या विरोधात आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये सीमा हैदरचे नाव इतके प्रसिद्ध झाले आहे की आता दिग्दर्शक तिच्यावर एक नाही तर दोन चित्रपट बनवणार आहेत.

सीमा आणि सचिनच्या प्रेमावर बनणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘कराची टू नोएडा’ आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे. निर्मात्यांनी चित्रपटासाठी ऑडिशन घेणे सुरू केले आहे. अमित जानी लवकरच या चित्रपटाचे थीम साँग रिलीज करणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले आहे. ज्यावर ‘कराची टू नोएडा’ असे मोठ्या थाटात लिहिले आहे.

‘कराची टू नोएडा’ पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, याआधी सीमा हैदरवर आणखी एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये तिला अभिनयाची ऑफरही आली आहे. पहिल्या चित्रपटात सीमाला रॉ एजंटची भूमिका देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ असे असेल. फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या संदर्भात सीमा हैदर यांच्यासोबत बैठकही घेतली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, सीमा हैदर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिला चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. पण चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी ती यूपी एटीएसकडून क्लीन चिटची वाट पाहत आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या घोषणेनंतर अमित जानी सांगतात की, आपल्याला सतत धमक्या येत आहेत. त्यांना धमकीचे फोन येत आहेत. याबाबत अमित जानी यांनी तक्रारही दिली आहे.