या मुस्लिम देशाने माध्यमांवर लादले विचित्र निर्बंध


इराक सरकारने ‘समलैंगिकता’ संदर्भात मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. देशाच्या माध्यम नियामकाने ‘समलैंगिकता’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. बुधवारी तेथील सर्व मीडिया आणि सोशल मीडिया कंपन्यांना आदेश जारी करण्यात आला. सर्व कंपन्यांनी ‘समलैंगिकता’ ऐवजी ‘सेक्शुअल डिव्हिअन्स’ हा शब्द वापरावा, असे आदेशात म्हटले आहे.

याशिवाय ‘लिंग’ या शब्दावरही बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाचा अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु त्यात दंडाचाही समावेश असू शकतो. ते म्हणाले की, इराक स्पष्टपणे समलैंगिकतेला गुन्हा मानत नाही.

साहजिकच LGBTIQ+ समुदायासाठी हा एक मोठा निर्णय आहे. 60 हून अधिक देशांमध्ये ‘समलैंगिकता’ गुन्हा घोषित करण्यात आला आहे, तर 130 हून अधिक देशांमध्ये समलिंगी संबंध कायदेशीर आहेत.

दरम्यान इराकने दोन दिवसांपूर्वी टेलिग्राम निलंबित केले होते. यासाठी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला. देशाच्या दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाची अखंडता जपण्यासाठी त्यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅप ब्लॉक केले आहे.