या व्यक्तीने जिंकली 13,082 कोटींची लॉटरी, एवढय़ात तो स्वत:साठी बांधू शकतो बुर्ज खलिफा


‘ऊपरवाला जब भी देता है तो छप्पर फाड़कर देता है’ अशा आशयाची एक म्हण आहे. असेच काहीसे अमेरिकेत मंगळवारी फ्लोरिडातील एका माणसासोबत घडले. या व्यक्तीने लॉटरी खरेदी केली होती, ज्यामध्ये त्याने 1.58 अब्ज डॉलर्स म्हणजेच 13,082 कोटी रुपयांची बंपर बक्षीस रक्कम जिंकली आहे. जॅकपॉट विजेत्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, परंतु लॉटरीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असल्याचे सांगितले जात आहे.

लॉटरी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पॉवरबॉल गेम अंतर्गत विजयी संख्या 13, 19, 20, 32, 33 होती. त्यात गोल्ड मेगा बॉल क्रमांक 14 देखील समाविष्ट होता. विजेत्याकडे आता अंदाजे $757.2 दशलक्ष (म्हणजे 6,269 कोटींहून अधिक) रकमेचा दावा करण्याचा किंवा 30 वार्षिक पेमेंटमध्ये संपूर्ण बक्षीसाचा दावा करण्याचा पर्याय असेल.

लॉटरी अधिकाऱ्यांच्या मते, 1.58 अब्ज डॉलरचे बक्षीस ऑक्टोबर 2018 मधील दक्षिण कॅरोलिना जॅकपॉटपेक्षा थोडे मोठे आहे. त्यानंतर विजयी बक्षीस रक्कम 1.537 अब्ज डॉलर्स होती. मात्र मंगळवारी फ्लोरिडातील एका व्यक्तीने जॅकपॉट जिंकून इतिहास रचला.

दरम्यान मेगा मिलियन्स तिकिटाची किंमत फक्त दोन डॉलर होती. ही तिकिटे अलाबामा, उटाह, अलास्का, हवाई आणि नेवाडा वगळता सर्व यूएस राज्यांमध्ये विकली जातात. पण जिंकण्याची शक्यता फारच कमी असते. असे म्हणतात की 30 कोटींपैकी फक्त एकाच व्यक्तीचे नशीब पलटते. अलिकडच्या काही महिन्यांत मेगा मिलियन्स जॅकपॉटला कोणीही जिंकलेला नाही.

विशेष म्हणजे या बक्षिसाच्या रकमेतून बुर्ज खलिफासारखी नवी इमारत बांधली जाऊ शकते. architecturaldigest च्या अहवालानुसार, बुर्ज खलिफा बांधण्यासाठी एकूण $1.5 बिलियन खर्च आला. त्यानुसार फ्लोरिडा येथील व्यक्तीने यापेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावले आहेत.