एशिया कप 2023 मध्ये शिखर धवनची एन्ट्री, पण करिअर संपले!


शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2021 मध्ये तो T20 टीममधून बाहेर होता. यानंतर गेल्या वर्षी खराब कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले होते. त्याच्या बाहेर पडण्याबरोबरच, रोहित शर्माला शुभमन गिलच्या रूपाने एक नवीन सलामीचा जोडीदार देखील मिळाला, जो त्याला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेतही साथ देताना दिसू शकतो. दरम्यान, अशा बातम्याही येत आहेत की, आशिया कपमध्ये धवनची एन्ट्री होऊ शकते. या महिन्याच्या अखेरीस धवन पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत दिसणार असला, तरी तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

भारतीय सलामीवीर धवन तज्ञ म्हणून स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा एक भाग असेल. स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडीओ शेअर केला असून, ज्यात त्यांनी हे उघड केले होते. मात्र, नंतर धवनचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला. त्या 56 सेकंदाच्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले होते की, धवनच्या नजरेतून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा जोश पाहा. धवन भारत-पाकिस्तानमधील संघर्षाबद्दल बोलतानाही दिसला.

पुढील महिन्यात 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. धवनने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आपण विश्वचषक जिंकू शकतो की नाही हे नेहमीच होते, परंतु आपल्याला पाकिस्तानविरुद्ध जिंकायचे आहे. तो म्हणाला, पण विश्वचषक जिंकणेही आवश्यक आहे. धवनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला, पण काही वेळातच धवनचा हा व्हिडिओ ब्रॉडकास्टरने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काढून टाकला.

आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. त्याचवेळी, पाकिस्तानचा स्पर्धेतील पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. धवनला या स्पर्धेत समालोचक म्हणून पाहिले जाऊ शकते. याचा अर्थ रोहित आणि धवनचे युग जवळपास संपले आहे.