बाप असावा तर असा… मुलीसाठी चंद्रावर घेतली जमीन, वाढदिवसाला दिले सरप्राईज गिफ्ट


एका वडिलांनी आपल्या मुलीला तिच्या वाढदिवशी असे गिफ्ट दिले, ज्याची खूप चर्चा होत आहे. मुलीच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त वडील अमित शर्मा यांनी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. अमित शर्मा हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर शहरातील वॉर्ड क्रमांक पाचचे रहिवासी आहेत. वडिलांच्या या सरप्राईज गिफ्टमुळे मुलगी तनिषा खूप खूश आहे. याच महिन्यात 8 ऑगस्टला तनिषाचा वाढदिवस होता.

यावेळी तिच्या वाढदिवशी तिचे वडील तिला असे गिफ्ट देतील याची स्वतः तनिषाला खात्री नव्हती. वास्तविक, अमित कुमार यांनी चंद्रावर आपल्या मुलीसाठी एक हेक्टर जमीन खरेदी केली आहे. जमीन खरेदीसाठी त्यांनी अमेरिकेतील लान्स एंजेलिसच्या लुना सोसायटी इंटरनॅशनलशी संपर्क साधला होता. ही जमीन विकत घेण्यासाठी अमित यांना 300 डॉलर खर्च करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

अमितच्या म्हणण्यानुसार, यावर्षी तनिषा तिच्या वाढदिवसाला चंदीगडमध्ये शिकत असल्याने घरी उपस्थित नव्हती. पण, मुलीला काहीतरी गिफ्ट द्यायचे होते. म्हणूनच अशी भेटवस्तू देण्याची योजना आखली, जी पाहून तिलाही अभिमान वाटेल. आता जेव्हा जेव्हा ती चंद्र पाहते तेव्हा ती नक्कीच म्हणेल की माझीही तेथे जमीन आहे.

अमित शर्मा यांच्या मते, चंद्रावर जमीन खरेदी करणे इतके सोपे नाही. त्यासाठी त्यांनी 4 जुलै रोजीच लुना सोसायटी इंटरनॅशनलकडे अर्ज केला होता. त्यासाठी लुना सोसायटीला ईमेल पाठवून पैसेही त्यांना ईमेलद्वारेच पाठवले होते. मात्र, येत्या काळात लोक नक्कीच चंद्रावर जातील आणि तिथे राहायला सुरुवात करतील, अशी अपेक्षा वकील अमित यांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत त्यांची मुलगीही तिथे स्वतःच्या जमिनीवर सहज घर बांधू शकेल.