Car Insurance Claim : बैल किंवा इतर प्राण्याशी टक्कर झाल्यास मिळतात का अपघात विम्याचे पैसे?


शेत असो वा रस्ता, सर्वत्र भटक्या जनावरांची समस्या आहे. भटके बैल शेताचे नुकसान तर करतातच शिवाय अपघाताचे कारण बनतात. बैल किंवा इतर कोणत्याही प्राण्याच्या धडकेने अपघात होत असल्याचे आपण दररोज पाहतो किंवा ऐकतो. अशा स्थितीत जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. असे नुकसान भरून काढण्यासाठी लोक वाहनाचा विमा काढतात. मात्र, मोठा प्रश्न असा आहे की, प्राण्यांच्या हल्ल्यामुळे किंवा धडकेने काही नुकसान झाले तर विमा कंपनी पैसे देणार का?

भारतात फिरताना आपल्याला सर्व प्रकारचे प्राणी भेटतात. गाय, बैल, कुत्रा, माकड असे प्राणी रस्त्यावर दिसतात. ते अनेकदा अपघात घडवून आणतात किंवा वाहनांना धडकतात. कोणतीही हानी टाळण्यासाठी तुम्हाला संरक्षणाची गरज असते. पण प्राण्याशी टक्कर होण्यासारख्या प्रकरणात काय दिलासा मिळेल?

भारतातील बहुतेक विमा कंपन्या सर्वसमावेशक विमा पॉलिसीमध्ये प्राण्यांच्या हल्ल्याचे संरक्षण करतात. तथापि, थर्ड पार्टी इन्शुरन्स जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांना कव्हर करत नाही. जर नुकसान टाळायचे असेल, तरच सर्वसमावेशक विमा योजना खरेदी करावी.

प्राणी करतात अशाप्रकारचे नुकसान

  • जनावरांमुळे कसे अपघात होतात ते इथे बघायला मिळते.
  • प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाला आणखी कशाची तरी धडक बसू शकते. विमा कंपनी अशा नुकसानाची भरपाई करते.
  • घरात कुत्र्यासारखे पाळीव प्राणी असल्यास ते सीट चावून किंवा नखे मारुन नुकसान करु शकतो. ही गोष्टही कव्हर केली जाते.
  • याशिवाय उंदीरही कारचे नुकसान करतात. दुसरीकडे चुकून एखादा पक्षी गाडीच्या आत गेल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

यासारख्या विविध अटी सर्वसमावेशक विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असतात. असे फायदे थर्ड पार्टीमध्ये उपलब्ध नसतात. सर्वसमावेशक विमा पॉलिसी तुमच्या वाहनाला झालेल्या जवळपास प्रत्येक नुकसानीला कव्हर करते. म्हणूनच ही पॉलिसी घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.