कॅनडाचा भारतीय विद्यार्थ्यांना आणखी एक झटका, सप्टेंबर सत्रासाठी 3 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द


कॅनडाने पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. ऑगस्ट-सप्टेंबर शैक्षणिक सत्राऐवजी, भारतीय विद्यार्थ्यांना जानेवारीमध्ये बोलावले जाईल म्हणजेच या विद्यार्थ्यांचे सप्टेंबर सत्रासाठीचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत तीन हजार भारतीय विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये कॅनडाला जाण्याची तयारी केली होती. त्यांची चिंता वाढली आहे. यातील बहुतांश विद्यार्थी पंजाबमधील आहेत. या विद्यार्थ्यांनी कॅनडात भाड्याने घरही घेतले आहे आणि त्यांनी तिकीटही बुक केले होते.

कॅनडातील ओंटारियो येथे असलेल्या नॉर्दर्न कॉलेजने या विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या सत्रात घेण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विद्यार्थ्यांना ऑगस्टच्या सुरुवातीला कॉलेजमधून मेलद्वारे याची माहिती मिळाली, तर यापूर्वी या विद्यार्थ्यांनी कॅनडा शिकण्यासाठी तिकीट काढले होते आणि त्यांना तिथे ठेवण्यासाठी घर भाड्याने घेतले होते.

कॅनडाच्या जागतिक शीख संघटनेने यासंदर्भात कॉलेजला पत्र लिहून अचानक प्रवेश रद्द करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही कॉलेजला पत्र लिहून सप्टेंबरपासूनच अभ्यास सुरू करण्याची विनंती केली आहे. या विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या सत्रात सामावून न घेतल्यास त्यांना पुन्हा जानेवारीच्या सत्रात अभ्यास करण्यासाठी कागदपत्र पडताळणी आदी प्रक्रियेतून जावे लागेल.

याआधीही 7000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडात हद्दपारीचा सामना करावा लागला होता. प्रवेशाच्या वेळी, कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने कॅनडा सरकारने सुमारे 7000 हजार भारतीय विद्यार्थ्यांना परत करण्याची नोटीस बजावली होती.