World breastfeeding week : जन्मानंतर नवजात बालकाला किती तासांनी करावे स्तनपान, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत


हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्या मागचा उद्देश आहे. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहील. डॉक्टरांच्या मते बाळाच्या पूर्ण पोषणासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान खूप फायदेशीर असते. यामुळे आई कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून दूर राहू शकते. आईच्या दुधात 400 प्रकारचे पोषकतत्व असतात. मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात आणि विकसित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दुधामध्ये बाळासाठी आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि प्रतिपिंडे असतात, जे त्यांच्या प्रतिकारशक्तीसाठी खूप चांगले असतात.

याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की आईच्या दुधात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. मुलाच्या मानसिक विकासासाठी हे खूप फायदेशीर आहे. आईच्या आरोग्यासाठी स्तनपान करणेही खूप महत्त्वाचं आहे. हे आईच्या शरीरातील चरबी नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे महिलेचे आरोग्य चांगले राहून बाळालाही वेळेवर पूर्ण पोषण मिळते.

स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, नवजात मुलाला जन्मानंतर लगेचच स्तनपान करायला हवे. याचा खूप फायदा होतो. स्तनपान करताना, तुम्ही ज्या बाजूला बाळाला दूध पाजता त्याच बाजूला हाताने बाळाच्या पाठीचा कणा, मान आणि पाठीच्या खालच्या बाजूस आधार द्या. स्तनपान करवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

मुलाच्या भूकेनुसार त्याला दूध पाजावे. जर बाळ मोठ्याने रडत असेल, तर ते भुकेचे लक्षण देखील असू शकते. या परिस्थितीत, आपण ताबडतोब बाळाला स्तनपान सुरू केले पाहिजे. स्तनपान करताना आईने सकस आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्यामुळे दुधात सर्व पोषक तत्वे टिकून राहून बालकांना खूप फायदा होतो. स्तनपानानंतर आईने तिच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की, स्त्रीने स्तनपानादरम्यान किंवा नंतर दारू आणि धूम्रपान करू नये. यामुळे खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे दुधाची गुणवत्ताही खराब होऊ शकते. यादरम्यान स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. अस्वच्छ ठिकाणी बाळाला कधीही स्तनपान करु नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही