SIP मधून कमवायचे असतील पैसे, कायम लक्षात ठेवा या 6 गोष्टी, अन्यथा होईल नुकसान


एक काळ होता, जेव्हा लोक बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पैसे साठवायचे. पण आता लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायला मागेपुढे पाहत नाहीत. आजच्या काळात गुंतवणुकीचे हजारो पर्याय आहेत. यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंडाची एसआयपी. जर तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे गुंतवले, तर तुम्हाला नफा मिळविण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. असेच काहीसे SIP गुंतवणूकदारांच्या बाबतीत घडले आहे. एसआयपीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही SIP मधून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा कष्टाने कमावलेला पैसा वाया जाईल. तुम्ही काय काळजी घ्यावी ते आम्ही तुम्हाला सांगतो.

लक्षात ठेवा या गोष्टी

मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका- SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही मोठी रक्कम गुंतवू नये. मोठी रक्कम गुंतवून भविष्यात पैशांच्या कमतरतेमुळे, तुमची एसआयपी खंडित होते आणि तुम्हाला कमी नफा मिळतो.

अशी बनवा मार्केट स्ट्रॅटेजी – जेव्हा मार्केटमध्ये तेजी असते, त्या वेळी गरज पडल्यास थोडा नफा घ्यावा. त्याचबरोबर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास थोडे अधिक पैसे गुंतवले पाहिजेत.

कंपाउंडिंगचा फायदा – एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा प्रचंड आहे. म्हणूनच एसआयपी दीर्घकाळासाठी केली पाहिजे, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.

मध्येच थांबवू नका SIP – शेअर बाजारात चढ-उतारांची प्रक्रिया सुरूच असते, यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मंदी पाहून अनेक जण गुंतवणूक करणे थांबवतात. असे करू नका. अशा वेळी तुम्हाला बरेच शेअर्स स्वस्तात मिळतील. अशा परिस्थितीत गुंतवणूक करून, जेव्हा तेजी येते, तेव्हा गुंतवणुकीचा भरपूर फायदा मिळवता येतो.

घाईघाईत गुंतवणूक करू नका – जेव्हा लोक बाजारात तेजी पाहतात, तेव्हा ते गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने हे चांगले नाही, कारण शेअर बाजार अप्रत्याशित आहे. यामध्ये बाजार वेगाने वाढतो, त्यानंतर दुप्पट वेगाने घसरतो देखील. त्यामुळे अशी गुंतवणूक टाळा.