या राज्यात कमी झाली खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी, जाणून घ्या एमबीबीएस, बीडीएससाठी किती करावा लागणार खर्च ?


NEET UG परीक्षेनंतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, हरियाणा सरकारकडून वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. हरियाणातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्काबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना केवळ सरकारने ठरवून दिलेले शुल्क भरावे लागणार आहे.

आता इतर राज्यांच्या तुलनेत हरियाणातील खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस करण्यासाठी कमी खर्च येईल. हरियाणाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी 1835 जागा आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी 950 जागा आहेत. तथापि, एनआरआय वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क वेगळे असेल.

हरियाणाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुमिता मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, आता राज्यातील खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 ते 19 लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी खासगी महाविद्यालयांमध्ये 60 लाखांपर्यंत शुल्क आकारले जात होते. दुसरीकडे, जर आपण बीडीएस अभ्यासक्रमाबद्दल बोललो, तर वर्षाला 1.94 लाख ते 4 लाख रुपये जमा करावे लागतील.

हरियाणा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने नुकतीच राऊंड 1 साठी हरियाणा NEET UG तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 प्रसिद्ध केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS च्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत, त्यांना आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट 2023 पूर्वी शिक्षण शुल्क भरावे लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा आहे, त्यामुळे हरियाणा सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी निश्चित शुल्काची घोषणा केली आहे. त्यामुळेच राज्यातील एकाही खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला किंवा विद्यापीठाला जादा पैसे आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिसूचनेनुसार एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सुरक्षा शुल्क 2 लाख रुपये आणि बीडीएससाठी 50000 रुपये ठेवण्यात आले आहे.