एमबीबीएससाठी कोणता देश आहे सर्वोत्तम, भारतीयांसाठी किती बदलले आहेत नियम ?


वैद्यकीय क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी परदेशात जातात. बॅचलर मेडिकल प्रोग्राम एमबीबीएस पदवी मिळवून चांगले डॉक्टर किंवा सर्जन बनण्यासाठी परदेशी वैद्यकीय महाविद्यालये ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कोणता देश सर्वोत्तम आहे? परदेशी महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवायचा? यासाठी किती खर्च येईल?

हजारो भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, जर्मनी आणि फिलीपिन्ससारख्या देशांमध्ये जातात. परदेशात शिकताना असाही प्रश्न पडतो की, तुम्ही ज्या देशात जात आहात त्या देशाची भाषा शिकणे आवश्यक आहे की नाही? येथे अशा प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊया.

एमबीबीएससाठी कोणता देश सर्वोत्तम आहे?

  1. जर्मनी: परदेशात जाणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या पाहिली, तर बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जर्मनीला जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेडलबर्ग युनिव्हर्सिटी आणि हॅम्बर्ग युनिव्हर्सिटी येथील सर्वात प्रसिद्ध आहेत. अत्यंत कमी शुल्कात तुम्ही येथून वैद्यकीय अभ्यासक्रम करू शकता. येथे 4 ते 6 लाख रुपये वार्षिक खर्चात एमबीबीएस करता येते. NEET स्कोरच्या मदतीने विद्यार्थी येथे प्रवेश घेऊ शकतात.
  2. रशिया : मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात जातात. येथे तुम्ही 6 वर्षांत एमबीबीएस पूर्ण करू शकता. MCI नियमानुसार, रशियामधून एमबीबीएस करण्यासाठी NEET स्कोअर असणे आवश्यक आहे. कुर्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे. याशिवाय बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्येही मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात.
  3. फिलीपिन्स: 2022 च्या आकडेवारीनुसार, फिलीपिन्समध्ये 15000 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी होते. येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) परीक्षेद्वारे केला जातो. येथील एमबीबीएस अभ्यासक्रम 5.5 ते 6.5 वर्षांचा आहे. यात एक वर्षाच्या इंटर्नशिपचाही समावेश आहे.

आवश्यक आहे का स्थानिक भाषेचे ज्ञान ?
एमबीबीएसच्या शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की, त्यांना ज्या देशात शिक्षणासाठी जायचे आहे, तेथील स्थानिक भाषा जाणून घेणे आवश्यक आहे का? वास्तविक, परदेशी महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रम इंग्रजीत असतात. तुमचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्थानिक भाषा शिकू शकता. अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषेचे अभ्यासक्रमही चालवले जातात.

एमबीबीएस केल्यानंतर मायदेशात परतणाऱ्यांसाठी काय आहेत नियम ?
परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम करून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोटीस बजावली होती. वैद्यकीय अभ्यासक्रम करून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथेही किमान 12 महिन्यांची इंटर्नशिप करावी लागेल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

खरं तर, गेल्या वर्षी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते.