नथिंग फोन 2 खरेदीवर मिळत आहे 7000 पर्यंतची सूट, या गोष्टी देखील मिळत आहेत सवलतीच्या दरात


जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर नुकताच लॉन्च झालेला नथिंग फोन 2 हा देखील एक चांगला पर्याय आहे. लंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने मोठी घोषणा केली आहे. दिग्गज फोन ब्रँडने इंडिपेंडन्स डे सेल ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत स्वस्त दरात नथिंग फोन 2 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन 44,999 रुपयांपासून लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, कंपनी हा फोन 7,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटसह विकणार आहे.

नथिंगचे सह-संस्थापक कार्ल पेई यांनी एका प्रसिद्धीपत्रकात भारतीय ग्राहकांसाठी असलेल्या सवलतीच्या ऑफरची माहिती दिली. नथिंग फोन 2 खरेदी केल्यावर, कंपनी ICICI बँक, कोटक बँक आणि HDFC बँकेच्या ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंतचा इस्टंट कॅशबॅक देईल. याशिवाय, जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नथिंग फोन 2 खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

नथिंग फोन 2: परवडणारी अॅक्सेसरीज
नथिंगची ऑफर फक्त इथेच संपत नाही. सेल दरम्यान, कंपनी Nothing Phone 2 अॅक्सेसरीजवर भरघोस सूट देखील देण्यात येणार आहे. त्याचे केस सवलतीनंतर 499 रुपयांना उपलब्ध होईल, तर अधिकृत स्क्रीन प्रोटेक्टर फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही नथिंग फोन 2 चा पॉवर अडॅप्टर रु. 1,999 मध्ये खरेदी करू शकता.

नथिंग इअर (स्टिक) वर सूट
नथिंग इअरवर (स्टिक) सुद्धा सवलतीचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही आधीपासून नथिंग फोन 1 किंवा फोन 2 चालवत असाल, तर कंपनी 8,499 रुपयांचा MRP चे इअर (स्टिक) 4,250 रुपयांना खरेदी करू शकता. तर उर्वरित लोकांसाठी इअरची (स्टिक) किंमत 4999 रुपये आहे. याशिवाय, त्याचे पांढरे प्रकार देखील उपलब्ध आहे, जे डिस्काउंटनंतर 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

जुलैमध्ये लॉन्च झाला नथिंग फोन 2
नथिंग फोन 2 हा गेल्या महिन्यातच लॉन्च झाला होता. हा हँडसेट ग्लिफ इंटरफेस डिझाइनसह येतो. नथिंगचा नवीन फोन नथिंग ओएस 2.0 वर चालतो. त्याचबरोबर या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सपोर्ट करण्यात आला आहे. नथिंग फोन 1 प्रमाणे, नथिंग फोन 2 हा देखील एक पारदर्शक फोन आहे.