नैराश्यामुळे या स्टार्सनी संपवले आपले जीवन, नितीन देसाईंसह या स्टार्सनी कवटाळले मृत्युला


आजकाल ‘डिप्रेशन’ हा शब्द ऐकायला मिळणे, अगदी सामान्य झाले आहे. पण ‘डिप्रेशन’ हा सामान्य आजार नाही. जर ते वाढले, तर ते एखाद्या व्यक्तीला स्वतःचा जीव देण्यास भाग पाडू शकते. चिंता आणि तणावात बुडलेली व्यक्ती त्याचा बळी ठरते. कालच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. ते देखील डिप्रेशनचेही बळी होते, असे बोलले जाते.

सुशांत सिंग राजपूत
असे पाऊल उचलणारे नितीन देसाई हे एकमेव सेलिब्रिटी नाहीत. याआधी अनेक बड्या स्टार्सनी डिप्रेशनमध्ये येऊन मृत्यूला कवटाळले आहे. बॉलीवूडचा तेजस्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मात्र, त्याच्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पण असे मानले जात होते की तो बऱ्याच काळापासून डिप्रेशनचा बळी होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरातून काही वैद्यकीय कागदपत्रे आणि अँटीडिप्रेसंट गोळ्याही सापडल्या होत्या.

दिशा सालियन
8 जून रोजी, बातमी समोर आली की सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा मालाडमधील तिच्या होणाऱ्या जोडीदाराच्या घराच्या 14 व्या मजल्यावरून कथितपणे उडी मारून किंवा चुकून पडल्यानंतर तिचा मृत्यू झाला. सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला.

कुशल पंजाबी
कुशल पंजाबीचा जन्म 1977 मध्ये झाला आणि त्याने अनेक रिअॅलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. 26 डिसेंबर 2019 रोजी तो मुंबईतील त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी या अभिनेत्याने मृत्युला कवटळले. कुशल पंजाबी हा देखील डिप्रेशनचा बळी होता.

जिया खान
जिया खानचे खरे नाव नफिसा रिझवी खान असून तिचा जन्म 1988 मध्ये झाला होता. ती एक ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका होती. 3 जून 2013 रोजी जिया तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. मृत्यूनंतर काही दिवसांनी जियाच्या घरातून सहा पानी सुसाईड नोट सापडली होती. पत्रात तिचा प्रियकर सूरज पांचोलीचे नाव होते. असे मानले जाते की जिया देखील बऱ्याच काळापासून नैराश्याशी लढत होती.

प्रत्युषा बॅनर्जी
प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील बालिका वधू या शोमध्ये ‘आनंदी’ची भूमिका साकारून घराघरात पोहचलेली प्रत्युषा 1 एप्रिल 2016 रोजी तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. बिग बॉस सीझन 7 मध्येही ती दिसली होती. प्रत्युषाबद्दल असेही म्हटले जाते की ती डिप्रेशनची शिकार होती आणि ती बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होती.

तुनिषा शर्मा
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानेही आत्महत्या करून सर्वांनाच हादरवून सोडले. अभिनेत्रीने तिच्या टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. 21 वर्षीय तुनिषा डिप्रेशनमध्ये होती. यामुळे त्याने स्वतःचा जीव घेतला.