पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर पुढील प्रवास कसा पूर्ण करेल चांद्रयान-3?


चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याच्या एक दिवस आधी त्याने पृथ्वीची कक्षा सोडली आणि ट्रान्स लूनर ट्रॅजेक्टोरीमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत चांद्रयान पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत फिरत होते. आता ते चंद्राच्या कक्षेकडे वेगाने जात आहे. इस्रो 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पहिल्या कक्षेत ते इंजेक्ट करू शकते.

चांद्रयान-3 ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे, या मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनेल. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने हा पराक्रम केला आहे. चांद्रयान-3 हे गेल्या 14 जुलै रोजी श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

कसा असेल पुढचा प्रवास
चांद्रयान-3 आता प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर आहे, सध्या त्याने चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी पृथ्वी सोडली आहे, इस्रोच्या म्हणण्यानुसार, 5 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचेल. म्हणजेच आत्तापर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे चांद्रयान 15 ऑगस्टनंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार असून हळूहळू प्रत्येक कक्षा ओलांडत चंद्राच्या मुख्य कक्षेत पोहोचणार आहे.

काय होईल तेव्हा ?
इस्रोच्या म्हणण्यानुसार, 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचेल. यानंतर, ते 9 ऑगस्ट रोजी पुढील कक्षेत, त्यानंतर 14, 16 ऑगस्ट आणि त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी शेवटच्या थांब्यावर पोहोचेल. ही तारीख असेल जेव्हा चांद्रयान प्रोपल्शन मॉड्यूल सोडेल आणि लँडिंगसाठी पूर्णपणे तयारी सुरू करेल. म्हणजेच हळूहळू त्याचा वेग कमी करत तो चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाईल आणि 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चंद्रावर उतरतील लँडर आणि रोव्हर
23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची जवाबदारी विक्रम लँडरची असेल, चंद्रावर पोहोचण्याचे काम प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे केले जाईल, जे 17 ऑगस्ट रोजी त्यापासून वेगळे केले जाईल. लँडर विक्रम पुढील काम हाताळेल आणि रोव्हर प्रज्ञानला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे घेऊन जाईल. यानंतर रोव्हर प्रज्ञान लँडरपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावरून महत्त्वाची माहिती गोळा करेल.