Deodhar Trophy Final : अर्जुन तेंडुलकरला धक्का, वगळले संघातून!


अर्जुन तेंडुलकर व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव कमावण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले. मात्र सध्या नशीब त्याच्यासोबत नाही, कदाचित त्यामुळेच त्याला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संधी मिळत नाही.

देवधर ट्रॉफीच्या फायनलमध्ये अर्जुनसोबत असेच काहीसे घडले. पूर्व विभागाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीसाठी अर्जुन तेंडुलकरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली नाही.

दक्षिण विभागाच्या संघाने अंतिम सामन्यात अर्जुन तेंडुलकरला वगळले आणि कावरप्पाला संधी दिली. तर अर्जुनने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती.

दरम्यान अर्जुन तेंडुलकरने गेल्या सामन्यात सेंट्रल झोनविरुद्ध 2 विकेट घेतल्या होत्या. उत्तर-पूर्व विभागाविरुद्धही त्याने विकेट घेतली. मात्र जेतेपदाच्या लढतीत त्याला वगळण्यात आले.

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मध्येही आपली प्रतिभा दाखवली. मात्र, या खेळाडूसाठी केवळ 4 सामने खेळले गेले. ज्यामध्ये त्याच्या नावावर तीन विकेट्स होत्या.