इंडिगोने आणली जबरदस्त ऑफर, फ्लाइट तिकिटांवर देत आहे ₹ 2000 पर्यंत सवलत


देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. कंपनी फ्लाइट तिकिट बुकिंगवर 2000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही विक्री तीन दिवस चालणार आहे. इंडिगोच्या कामकाजाला 17 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ‘अ‍ॅनिव्हर्सरी सेल’ सुरू केला आहे. त्याचे तपशील खाली दिले आहेत

कंपनीची ही ऑफर आजपासून सुरू झाली असून 4 ऑगस्ट 2022 पर्यंत चालेल. अशा परिस्थितीत, जे या कालावधीत विमान तिकीट बुक करतात, त्यांना वाजवी किंमतीवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही सवलत सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या ऑफरला ‘HappyIndiGoDay’ असे नाव दिले आहे.

होणार 12 टक्क्यांपर्यंत पैशांची बचत
इंडिगो एअरलाइन्स त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे बुक केलेल्या सर्व तिकिटांवर 12 टक्के सूट देत आहे. ही सवलत 3 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल, तर 4 ऑगस्टला तिकीट बुकिंगवर केवळ 7 टक्के सूट मिळेल. सवलतीची मर्यादा रु.2,000 पर्यंत आहे.

क्रेडिट कार्डवर वाचवा अतिरिक्त पैसे
या ऑफरसाठी इंडिगोने अमेरिकन एक्सप्रेस आणि एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डसोबत करार केला आहे. यावर लोकांना अतिरिक्त फायदा मिळेल आणि 2 ऑगस्टला म्हणजेच आजच्या दिवशी तिकीट बुक केल्यावर त्यांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. अमेरिकन एक्सप्रेसच्या ग्राहकांसाठी, 5,000 रुपयांच्या किमान ऑर्डर मूल्यावर 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक असेल.

HSBC क्रेडिट कार्डवर 3500 रुपयांच्या ऑर्डर मूल्यावर 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या कार्डवरील ऑफर 4 ऑगस्टपर्यंत वैध आहे आणि कमाल सूट मर्यादा रु.2,000 आहे.

17 रुपयात मिळणार आवडती सीट
इतकेच नाही तर या ऑफर अंतर्गत इंडिगो लोकांना त्यांची आवडती सीट निवडण्याचे स्वातंत्र्य देत आहे. तीन दिवसांच्या सेल दरम्यान यासाठी 17 रुपयांपासून पेमेंट सुरू आहे.