Eye Flu : लहान मुले का अडकत आहेत डोळ्यांच्या फ्लूच्या विळख्यात? जाणून घ्या तज्ञांकडून


काही आठवड्यांपूर्वी डोळ्यांच्या फ्लूचे रुग्ण वाढले होते, जे आता कमी होण्याचे नाव घेत नाहीत. विशेष म्हणजे रुग्णालयांच्या नेत्र विभागाच्या ओपीडीमध्ये डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होत आहे, मात्र डोळ्यांच्या फ्लूचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आढळून येत आहे. दरम्यान, असाही प्रश्न उपस्थित होत आहे की, डोळ्यांच्या फ्लूचे जास्त रुग्ण लहान मुलांमध्ये का येत आहेत? याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेऊया.

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील नेत्र विभागातील एचओडी प्रोफेसर सांगतात की मुलांमध्ये डोळ्यांच्या फ्लूची अधिक प्रकरणे येत आहेत. याचे कारण लहान मुले मोठ्यांच्या तुलनेत हाताची स्वच्छता (हात धुणे) आणि स्वच्छतेची काळजी घेऊ शकत नाहीत. लहान मुलांना रोगापासून बचाव करण्याबाबत फारशी माहिती नसते. ते एकमेकांच्या संपर्कातही राहतात.

अशा स्थितीत फ्लूचा विषाणू एका मुलाकडून दुसऱ्या मुलामध्ये वेगाने पसरतो. यामुळेच मुलांमध्ये डोळ्यांच्या फ्लूचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला डोळ्याच्या फ्लूची लक्षणे दिसत असतील, तर त्यावर उपचार करा.

ही लक्षणे दिसताच त्यांना रुग्णालयात दाखल करा
जर मुलांचे डोळे लाल, पाणीदार किंवा जळजळत असतील, तर ही डोळ्यांच्या फ्लूची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच त्यांना रुग्णालयात घेऊन जा. घरी स्वत:च औषधोपचार करण्याचे टाळा. घरगुती उपायांनी डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. जर मुलाला आधीच डोळ्यांचा संसर्ग झाला असेल, तर समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे डोळ्यांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

बचाव कसा करायचा?

1. मुलांना शाळेत नेण्यासाठी हँड सॅनिटायझर द्या

2. मुलांना साबणाने आणि पाण्याने हात धुण्यास शिक्षित करा

3. मुलांना हात न धुता चेहरा, विशेषत: डोळ्याच्या भागाला स्पर्श करू नये असे सांगा.

4. मुलांना स्विमिंग पूलमध्ये पाठवू नका

5. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही