IND vs WI : रोहित शर्माला ज्याची भीती वाटत होती, तेच झाले मोहम्मद सिराजच्या बाबतीत


वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जबरदस्त फॉर्मात आहे. असे असूनही, त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. तो भारतात परतत आहे. बोर्डाने त्याला विश्रांती देण्यास सांगितले आहे, मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही, येत्या काही महिन्यांवर भारताचा विश्वचषक आहे आणि विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात असताना अशा वेळी त्याला विश्रांतीची गरज का पडली.

सिराजच्या जागी संघाने कोणत्याही बदली खेळाडूची मागणी केलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने बार्बाडोसमध्ये, तर शेवटचा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने सिराजला संघातून वगळण्याचे खरे कारण सांगितले आणि आता ते कारण समोर आले, त्यामुळे कर्णधार रोहित शर्माची भीतीही खरी ठरू लागली आहे.


बोर्डाने सांगितले की, सिराजने घोट्याच्या दुखण्याची तक्रार केली होती, त्यामुळे वैद्यकीय पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली आहे. सिराजच्या जागी संघाने कोणत्याही बदली खेळाडूची मागणी केलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने बार्बाडोसमध्ये, तर शेवटचा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल.

खरंतर रोहितला या गोष्टीची भीती वाटत होती. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने खेळाडूंच्या दुखापतींबाबत भाष्य केले. तो म्हणाला होता की, खेळाडू कधीही दुखावू शकतात, पण असे होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. रोहितने पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या दुखापतीबाबत भीती व्यक्त केली आणि काही वेळाने सिराज मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी आली.