Vijay Diwas : भारतीय जवानांनी कारगिलमध्ये दहशतवाद्यांना कसे दिले चोख प्रत्युत्तर, वाचा 85 दिवस चाललेल्या ऑपरेशन विजयची कहाणी


26 जुलै 1999 ही तारीख, जेव्हा भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन विजय मिळवला. त्यांच्या योजना हाणून पाडल्या. 85 दिवस चाललेल्या या युद्धाला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील टेकडीवर देशाचे रक्षण करताना 500 हून अधिक भारतीय जवान शहीद झाले. आज कारगिल युद्धाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑपरेशन विजयची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.

जेव्हा पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करू लागले तेव्हापासून त्याची सुरुवात झाली. कारगिलच्या डोंगराळ भागातून भारतावर हल्ला करण्याची योजना आखली. घुसखोरी 3 मे रोजी सुरू झाली आणि 26 जुलै रोजी युद्ध संपले. 85 दिवस दोन्ही देश आमनेसामने होते आणि 60 दिवस सरळ युद्ध चालले.

केव्हा आणि काय झाले, ऑपरेशन विजयची संपूर्ण कथा वाचा

  • 3 मे 1999: कारगिलच्या टेकडीवर एका मेंढपाळाने पहिल्यांदा पाकिस्तानी सैनिकांच्या दहशतवाद्यांना पाहिले होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
  • 5 मे : घुसखोरीच्या वृत्तानंतर भारतीय लष्कर सतर्क झाले आणि शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांना ज्या ठिकाणाहून घुसखोरी झाली, त्या ठिकाणी पाठवण्यात आले. दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले आणि 5 भारतीय जवान शहीद झाले.
  • 9 मे : पाकिस्तानी सैन्याने कारगिल टेकडीमध्ये घुसून भारतीय जवानांच्या दारूगोळ्याला लक्ष्य केले आणि गोळीबार सुरू केला.
  • 10 मे : पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडली. द्रास आणि ककसार सेक्टर पार करून ते जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात पोहोचले. या दिवशी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजयची घोषणा केली आणि काश्मीरमधून सैन्य कारगिलला पाठवण्यात आले.
  • 26 मे : भारतीय हवाई दलानेही कमांड हाती घेतली. पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत अनेक पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला.
  • 1 जून: पाकिस्तानने हल्ले तीव्र केले आणि राष्ट्रीय महामार्ग-1 ला आपले लक्ष्य बनवले. हा तो काळ होता, जेव्हा जगातील देश भारतासोबत होते आणि पाकिस्तानवर टीका करत होते. या हल्ल्यांसाठी फ्रान्स आणि अमेरिकेने थेट पाकिस्तानला जबाबदार धरले.
  • 5 जून : भारत सरकारने या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याचे अनेक कागदपत्रे जाहीर केली.
  • 9 जून: भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले शौर्य दाखवत जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये मोठा विजय मिळवला. येथे दोन प्रमुख ठिकाणे परत काबीज केली.
  • 13 जून : भारतीय जवानांनी टोलोलिंग शिखर काबीज केल्यावर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. यादरम्यान देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी स्वतः कारगिलला पोहोचले होते.
  • 20 जून: भारतीय सेनने टायगर हिलजवळ एकामागून एक अनेक ठिकाणे पुन्हा ताब्यात घेतली आणि पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला.
  • 4 जुलै: सैनिकांनी टायगर हिल ताब्यात घेतल्याने हा दिवस भारतीय सैन्यासाठी महत्त्वपूर्ण होता.
  • 5 जुलै : वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि पाक सैनिकांच्या सततच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी कारगिलमधून लष्कर मागे घेण्याची घोषणा केली.
  • 12 जुलै : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना माघार घ्यायला लावली आणि हीच वेळ आली, जेव्हा त्यांनी हार मानायला सुरुवात केली.
  • 14 जुलै : तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय लष्कराचे ऑपरेशन विजय यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा केली.
  • 26 जुलै : भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलेला सर्व भाग परत मिळवला आणि कारगिल युद्ध संपुष्टात आले. या युद्धात 3 हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले आणि 500 ​​हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले.