भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन, तर निकोलस पूरन आणि जेसन होल्डर बाहेर


आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शिमरॉन हेटमायर आणि ओशाने थॉमस हे दिर्घकाळ खेळात नसलेले वनडे संघात परतले आहेत. दरम्यान, निकोलस पूरन एमएलसी स्पर्धेमुळे अनुपलब्ध आहे, तर जेसन होल्डरचे नाव वनडे संघात समाविष्ट नाही. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी होणार आहे.

शिमरॉन हेटमायर ऑगस्ट 2022 मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा खेळला पण एका वर्षानंतर परतला. दरम्यान, वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसही परतला. थॉमस डिसेंबर 2021 मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा खेळला होता आणि अलीकडच्या काळात फिटनेसच्या समस्यांमुळे तो दूर होता. वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि लेगस्पिनर यानिक कारिया यांचा शस्त्रक्रियेनंतर समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर फिरकी गोलंदाज गुडाकेश मोतीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वेस्ट इंडिज संघ: शाई होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), अलिक अथानाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जयडेन सील्स, रोमॅरिओ सिनफेर, रोमॅरिओ सिनफेर.