Railway Vacancy 2023 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत भरती, 1000 हून अधिक पदांसाठी असा कराल अर्ज


रेल्वेमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) मध्ये एक हजाराहून अधिक पदांच्या भरतीसाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 22 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. या रेल्वेच्या रिक्त जागा सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच GDCE कोट्याअंतर्गत भरल्या जातील.

पदांचा तपशील

  • असिस्टंट लोको पायलट: 820 पदे
  • तंत्रज्ञ: 132 पदे
  • कनिष्ठ अभियंता: 64 पदे

शैक्षणिक पात्रता
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच त्यांनी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमाही केलेला असावा.

वयोमर्यादा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

वेतनश्रेणी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील भरतीअंतर्गत निवड झाल्यास उमेदवाराला दरमहा 61 हजार 500 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

याप्रमाणे करा SECR भरतीसाठी अर्ज

  • सर्वप्रथम secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • आता ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
  • आता विचारलेले सर्व तपशील भरा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • अगदी शेवटी फॉर्म सबमिट करा.