जोडप्याने कधी करावा आयव्हीएफचा अवलंब, किती आहे प्रक्रिया आणि उपचारांचा खर्च? जाणून घ्या तज्ज्ञांकडून


गेल्या दशकात वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही वंध्यत्वाचे बळी ठरत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि आरामदायी जीवनशैलीमुळे ही समस्या वाढत आहे. आता वंध्यत्वाच्या उपचारासाठी IVF (In Vitro Fertilization) ची मदत घेण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. शहरी भागात आयव्हीएफ क्लिनिकची संख्या वाढत आहे. आयव्हीएफच्या मदतीने अपत्यहीन जोडप्यांना अपत्याचा आनंद मिळू शकतो, मात्र त्यासाठी या प्रक्रियेची मदत कधी घ्यावी आणि त्यासाठी किती खर्च येतो, हे जाणून घेतले पाहिजे.

आयव्हीएफ म्हणजे काय ते आपण आधी सांगू. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, IVF च्या माध्यमातून स्त्रीचे अंडे आणि पुरुषाचे शुक्राणू लॅबमध्ये फलित केले जातात. यापासून तयार झालेला भ्रूण पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात टाकले जाते. या प्रक्रियेत फारसा त्रास होत नाही.

कधी घ्यावी IVF ची मदत ?
याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, जर एखादे जोडपे सहा महिने कोणत्याही संरक्षणाशिवाय शारीरिक संबंध ठेवत असेल, तरीही मूल होत नसेल, तर हे वंध्यत्वाचे लक्षण आहे. अशी जोडपी आयव्हीएफची मदत घेऊ शकतात.

अशा परिस्थितीत घेतली जाऊ शकते IVF ची मदत

  • फॅलोपियन ट्यूब अवरोधित आहे.
  • दीर्घकाळ PCOD ही समस्या
  • ओवरीमधील संसर्ग
  • गर्भाशयात स्टोन
  • अनुवांशिक रोग
  • पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी
  • शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नसणे

कोणत्या वयात फायदेशीर आहे IVF करणे ?
तज्ज्ञ सांगतात की वयाच्या 35 वर्षापर्यंत आयव्हीएफ करणे जास्त फायदेशीर आहे. IVF करण्यापूर्वी जोडप्यांच्या अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत. यामध्ये, स्त्रीला कोणताही धोकादायक संसर्ग (एचआयव्ही, कर्करोग) नसल्याचे दिसून येते. हिपॅटायटीस आणि इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्गाची देखील तपासणी केली जाते. त्यानंतरच आयव्हीएफ केले जाते.

किती आहे त्याचा खर्च
आयव्हीएफला एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण हे उपचार कुठे केले जात आहेत, यावर अवलंबून आहे. खाजगी दवाखान्यात हा खर्च 3 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ मोफत केले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही