ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने रोहित शर्माची उडवली खिल्ली, चाहत्यांनी अशी बंद केली त्याची बोलती


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने शानदार फलंदाजी करत 80 धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत. मात्र याचदरम्यान एका महिला क्रिकेटरने रोहितबाबत वेगळीच गोष्ट सांगितली आहे. या महिला क्रिकेटपटूने रोहितची खिल्ली उडवली आहे. ही खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाची अमांडा वेलिंग्टन.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता त्याचे लक्ष दुसरा सामना आपल्या नावावर करण्यावर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने चार गडी गमावून 288 धावा केल्या आहेत.


आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी आणि 14 एकदिवसीय सामने खेळलेल्या अमांडाने रोहितची खिल्ली उडवणारे ट्विट केले. तिने रोहितच्या केसांची खिल्ली उडवली आहे. अमांडाने ट्विट करून लिहिले आहे की, रोहित शर्माला केस कापण्याची गरज आहे. अमांडाच्या या ट्विटनंतर ती रोहित शर्माच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. रोहितचे चाहते अमांडाला प्रचंड ट्रोल करण्यात व्यस्त आहेत.


या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित आणि त्याचा नवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी अर्धशतके झळकावली आणि पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या कसोटी सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यात यशस्वीने 57 धावांची खेळी केली.

डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या डावात 74 चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकारांशिवाय एक षटकार ठोकला. त्याचवेळी रोहितचे शतक हुकले आणि तो 143 चेंडूत 80 धावा करून बाद झाला. त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट कोहली नाबाद 87 धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा 36 धावा करून नाबाद आहे.