Siddhivinayak Temple : अष्टविनायकात नाही या गणपतीच्या मंदिराचा समावेश, तरीही दररोज जमते लाखो भाविकांची


हिंदू धर्मातील भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणेच, गणपतीची आठ पवित्र निवासस्थाने, ज्यांची पूजा केली जाते, ती अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. गणपतीची ही आठ मंदिरे म्हणजे मयुरेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर, वरदविनायक मंदिर, चिंतामणी मंदिर, गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर, विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर आणि महागणपती मंदिर, ज्यांना अष्टविनायक म्हटले जाते, परंतु सध्याच्या यादीत या 8 मंदिरांच्या यादी समावेश नसतानाही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी का होते, जाणून घेऊया त्याचे धार्मिक महत्त्व.

  • देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दिसणारी मूर्ती एकाच काळ्या दगडात कोरलेली आहे.
  • या गणपतीच्या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड उजवीकडे असल्याने त्याची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हिंदू मान्यतेनुसार, गणपतीची अशी मूर्ती असलेले मंदिर हे त्यांचे सिद्धधाम आहे, जिथे पूजा केल्यावर, भक्तांच्या सर्वात मोठ्या इच्छा झटक्यात पूर्ण होतात.
  • सिद्धिविनायक मंदिरात गणपती आपली देवी रिद्धी आणि सिद्धी देवीसोबत विराजमान आहेत. अशा स्थितीत या मंदिरात पूजा केल्याने शुभ आणि सौभाग्य सोबतच माता रिद्धी आणि माता सिद्धी यांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
  • सिद्धी विनायक हे देशातील अशा मंदिरांपैकी एक आहे, जिथे जास्तीत जास्त दान अर्पण केले जाते. मंदिरात गणपतीचे वाहन म्हणवल्या जाण्याऱ्या उंदरांची चांदीची मूर्ती देखील आहे, ज्याच्या कानाजवळ भक्त आपली इच्छा सांगतात जेणेकरून ते त्यांची इच्छा गणपतीजवळ पोहोचवतील.
  • देशातील सर्व प्रसिद्ध मंदिरांप्रमाणेच सिद्धिविनायक मंदिराची आरतीही खूप प्रसिद्ध आहे, ती पाहण्यासाठी लोक दूरवरून पोहोचतात किंवा घरी बसून थेट पहातात. भगवान सिद्धिविनायकाबद्दल अशी श्रद्धा आहे की त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
  • हिंदू मान्यतेनुसार जो भक्त रोज विधीपूर्वक भगवान सिद्धिविनायकाची पूजा करतो, त्याच्यावर गणपतीचा आशीर्वाद सतत पडतो आणि रिद्धी-सिद्धी प्राप्त होते.

श्रावणात गणपती पूजेचे महत्व
श्रावण महिन्यात, ज्यामध्ये सोमवार भगवान शिवाच्या पूजेसाठी आणि मंगळवार मंगळागौरीच्या पूजेसाठी समर्पित आहे, बुधवार हा दिवस दु:ख दूर करणारा आणि आनंद देणाऱ्या गणेशाच्या उपासनेसाठी फलदायी मानला जातो. याशिवाय, श्रावण महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही त्यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. गणपतीकडून अपेक्षित आशीर्वाद मिळवायचा असेल, तर त्याच्या पूजेत त्याला 21 दुर्वा आणि 21 मोदक किंवा मोतीचूर लाडू अर्पण केल्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक समजुतींवर आधारित आहे, त्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)