गौतम अदानींच्या विजेने उजळून निघणार बांगलादेश, सुरु झाला पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प सुरू


भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने शनिवारी गोड्डा पॉवर प्लांट पूर्णपणे कार्यान्वित केला. हा देशातील पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प आहे जिथे निर्माण होणारी 100 टक्के वीज बांगलादेशात जाईल. हे यश संपादन केल्यानंतर गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचीही ढाका येथे भेट घेतली.

गोड्डा पॉवर प्लांट अदानी पॉवर झारखंड लिमिटेडने बांधला आहे, जो अदानी पॉवर लिमिटेडची 100 टक्के उपकंपनी आहे. 12 जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने काम करणाऱ्या प्लांटची चाचणी पूर्ण झाली. या प्रकल्पाची क्षमता 1600 मेगावॅट आहे.

गोड्डा पॉवर प्लांटचे काम विक्रमी साडेतीन वर्षांत पूर्ण झाले आहे. दरम्यान, कोविडचा सामना करूनही, प्लांट पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्यासाठी बांगलादेशसोबत 25 वर्षांच्या कालावधीसाठी वीज खरेदी करारही करण्यात आला आहे.

या वीज प्रकल्पाचा पहिला टप्पा 6 एप्रिल रोजी कार्यान्वित झाला. त्यानंतर बांगलादेशला 800 मेगावॅट वीजपुरवठा सुरू करण्यात आला. 26 जून रोजी 800 मेगावॅटचे दुसरे युनिट सुरू झाले, परंतु त्यातून व्यावसायिक पुरवठा सुरू झाला नाही. आवश्यक चाचण्या घेतल्यानंतर शनिवारी ते ताब्यात देण्यात आले.

हा पॉवर प्लांट भारत-बांग्लादेश संबंधातील एक नवा विक्रम आहे. या पॉवर प्लांटसोबतच अदानी ग्रुपने 105 किमी लांबीची 400 केव्ही डबल सर्किट ट्रान्समिशन लाइनही टाकली आहे. बांगलादेश सध्या द्रव इंधनापासून वीज निर्मितीचे काम करत आहे. याउलट, गोड्डा पॉवर प्लांट हा एक सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट आहे, जो बांगलादेशला स्वस्त वीज पुरवेल.