यशस्वी जैस्वालने 10 वर्षे साजरी केली नाही दिवाळी, त्यांची आणखी एक कहाणी डोळ्यात आणेल पाणी


त्याने तंबूत वेळ काढला, तंबूत पावसात रात्रभर ठिबकत पाण्यात घालवली. ज्या वयात मुले आई-वडिलांच्या मदतीने जग जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या वयात त्याने घर सोडले. लहान वयातच डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन तो मुंबईत आला. कुठून सुरुवात करावी, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते, पण आज तो एक स्टार आहे आणि त्या स्टारचे नाव आहे यशस्वी जैस्वाल. आज जैस्वालमध्ये भारतीय क्रिकेटचे भवितव्य दिसत आहे. तो फक्त 21 वर्षांचा आहे, पण जेव्हा हेल्मेट घालून, हातात बॅट घेऊन, टीम इंडियाच्या जर्सीमध्ये, तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानावर दिसला, तेव्हा तो अनुभवी खेळाडूपेक्षा कमी दिसत नव्हता.

त्याने अनुभवी खेळाडूसारखा खेळ दाखवला आणि पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले. त्याचा प्रयत्न द्विशतकासाठी होता, पण डाव 171 धावांवर संपुष्टात आला. आज तो चमकत आहे, पण त्याच्या चमकण्यामागे अंधारातून बाहेर येण्याची कथा आहे. जैस्वालने घामाने तो अंधार दूर केला नसता, तर कदाचित तो त्या अंधारात हरवून गेला असता. तो अंधार नाहीसा करण्यासाठी त्याने सुमारे 10 वर्षे नीट दिवाळी साजरी केली नाही.

दिवाळीत जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात लोक आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतात. तर जैस्वालला 10 वर्षांपासून पालकांसोबत हा सण साजरा करता आला नाही. सगळ्यात मोठ्या सणात जिथे प्रत्येकजण आपापल्या परिवारासोबत होता, तिथे जयस्वाल त्यांच्यापासून दूर जात होता. वडिलांनी दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने काय काय केले नाही. कुटुंबाला भेटण्याची तळमळ असूनही तो थकून रात्री आपल्या तंबूत पोहोचायचा, तेव्हा त्याला योग्य विश्रांती मिळत नव्हती.

जगण्यासाठी वडिलांना पैसे मागावे लागू नयेत म्हणून त्याने पाणीपुरी देखील विकली. आज यशस्वीकडे सर्व काही आहे, जे त्याचे स्वप्न होते. सुमारे 2 वर्षांपूर्वी, भारतीय फलंदाजाने स्वतः इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, तो किती वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू शकत नाही. आपल्याला जिथे जायचे आहे, तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने सांगितले.

जैस्वालने सांगितले की, त्यांना क्रिकेट खेळताना पाहण्याचे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, ज्याचे त्याने पालन केले आणि क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तु हे करू शकतो, असे वडिलांचे शब्द होते, असे यशस्वीने सांगितले. तो म्हणाला की त्याला आपल्या वडिलांसारखे व्हायचे आहे. भारताचा नवोदित फलंदाज पुढे म्हणाला की त्याच्या पालकांच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.