आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. 31 जुलैपूर्वी आयटीआर भरणे खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान सध्या ही मुदत पुढे जाणे अपेक्षित नाही. जर तुम्ही शेवटच्या तारखेपूर्वी ITR भरला नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. नोकरी सोडून इतर मार्गाने पैसे कमावणारे बरेच लोक आहेत. तर काही परदेशात जाऊन नोकरी करतात. आता त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहतो की त्यांनी आयटीआर भरावा की नाही… इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला तुमची सर्व कमाई सांगावी लागेल. आयटीआर भरताना तुम्ही कोणतीही माहिती लपवल्यास तुम्हाला 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
ITR Filling : आयकर भरताना ही गोष्ट न सांगितल्यास भरावा लागेल 10 लाखांचा दंड
नुकतेच आयकर विभागाने सर्व करदात्यांना सतर्क केले आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की ज्यांचे खाते किंवा उत्पन्न देशाबाहेर आहे अशा करदात्यांनी आयटीआर भरताना विदेशी मालमत्ता शेड्यूल भरणे आवश्यक आहे. हे विदेशी मालमत्ता शेड्यूल काय आहे आणि तुम्ही ते कसे दाखल करू शकता, ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Kind Attention: Holders of foreign bank accounts, assets, and income!
Please don't forget to fill the Foreign Asset Schedule in your Income Tax Return (ITR) for Assessment Year 2023-24.
Please ensure you disclose all Foreign Assets (FA) and Foreign Sources of Income (FSI) if… pic.twitter.com/0l8CntCm9Q
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 14, 2023
आयकर विभागाने ट्विट करून सर्व करदात्यांना सतर्क केले आहे. विभागाने म्हटले आहे की ज्या करदात्यांचे दुसऱ्या देशात खाते किंवा उत्पन्न आहे, त्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर भरताना परदेशी मालमत्ता शेड्यूल भरणे आवश्यक आहे. करदात्यांना हे सांगणे आवश्यक आहे की त्यांनी अशा प्रकरणांमध्ये त्यांचे सर्व परदेशी उत्पन्न आणि मालमत्तेची माहिती देणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, जर एखाद्या करदात्याने ही माहिती लपवली तर आयकर विभाग त्याच्यावर कारवाई करू शकतो. आयटी विभागाचे म्हणणे आहे की काळा पैसा आणि कर कायदा 2015 अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये करदात्याकडून 10 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो.
जर एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात 182 दिवस देशात (भारत) राहिली, तर त्याला निवासी मानले जाते. रहिवासी भारतीयांचे जागतिक उत्पन्न कराच्या कक्षेत येते. परदेशात मिळणारा पगार पगार हेडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाखाली दाखवावा लागेल. तुम्हाला परकीय चलनात मिळणारा पगार रुपयात रूपांतरित करावा लागेल आणि नियोक्त्याचा तपशील द्यावा लागेल.
जर या पगारावर कोणत्याही प्रकारचा कर कापला गेला असेल, तर तुम्ही रिटर्नमध्ये दाखवून टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकता. तुम्ही डबल टॅक्सेशन अवॉयडन्स अॅग्रीमेंट (DTAA) चा फायदा घेऊन दुहेरी कर टाळू शकता.