भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याची गुपिते आजपर्यंत कोणालाही उकलता आलेली नाहीत. या रहस्यांमुळे ही ठिकाणे लोकांमध्येही लोकप्रिय आहेत. हिमाचल प्रदेशचे जटोला शिव मंदिर हे या ठिकाणांपैकी एक आहे, ज्याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.
हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन येथे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. आशियातील सर्वात उंच मंदिरांपैकी हे एक असल्याचा दावा केला जात आहे.
मंदिराच्या आत स्फटिकाचे शिवलिंग आहे. मंदिराच्या वरच्या भागात 11 फूट उंच सोन्याचा कलशही बसवण्यात आला आहे. त्यामुळे लोक येथे भेटीसाठी येतात.
या मंदिरातील दगडावर हात मारल्याने डमरूचा आवाज येतो असे म्हणतात. द्रविश शैलीत बांधलेले हे मंदिर सुमारे 111 फूट उंच आहे. येथे भगवान शिव स्वतः आले होते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची पायाभरणी 1974 साली झाली. करोडो खर्चून बांधलेले हे मंदिर पूर्ण होण्यास 39 वर्षे लागली. देश-विदेशातील भाविकांनी दिलेल्या पैशातून हे मंदिर उभारण्यात आले आहे.