Kaal Sarp Dosh Nivaran : या मंदिरात केली जाते नागांच्या राजाची पूजा, नुसत्या दर्शनाने निघून जातो कालसर्प दोष


जर कुंडलीत कालसर्प दोष असेल, तर व्यक्ती नेहमी समस्यांनी घेरलेली असते आणि यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कालसर्प दोषाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यासाठी देशात अनेक मंदिरे आहेत. भारतामध्ये असे एक मंदिर आहे जेथे केवळ नाग देवतेचे दर्शन घेतल्यास कालसर्प दोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया हे मंदिर कुठे आहे आणि येथे कशी केली जाते पूजा ?

कुठे आहे हे मंदिर ?
आज आपण नागराज वासुकी मंदिराबद्दल बोलत आहोत, जे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आहे आणि खूप लोकप्रिय आहे. हे मंदिर प्रयागराजच्या दारागंज परिसरातील उत्तरेकडील टोकाला असून येथे नागराज देवतेची मूर्ती आहे. नागराजाच्या दर्शनानेच कालसर्प दोष दूर होतो असे म्हणतात.

अशा प्रकारे मिळते कालसर्प दोषापासून मुक्ती
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्याला नागराज वासुकी मंदिरात पूजेसाठी स्वतःचे साहित्य न्यावे लागते. पूजेपूर्वी संगमात स्नान करणे बंधनकारक असून स्नानानंतर मंदिरात जाऊन पूजा केली जाते. पूजेसाठी साहित्यात वाटाणे, हरभरा, फुले, हार आणि दूध असणे आवश्यक आहे. हे साहित्य घेऊन नागराज वासुकीच्या मूर्तीसमोर बसून त्यांचे दर्शन घ्या. यानंतर साहित्य अर्पण करून कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी.

या मंदिराशी संबंधित पौराणिक कथा
एका आख्यायिकेनुसार, एका मराठा राजाला कुष्ठरोग झाला होता. त्यानंतर त्यांनी नागराज वासुकी मंदिरात जाऊन नवस केला आणि तो बरा झाला, तर मंदिराचा जीर्णोद्धार करू, असे सांगितले. यानंतर नागराजच्या कृपेने राजाचा कुष्ठरोग बरा झाला आणि तेव्हापासून या मंदिराची महती खूप वाढली.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक समजुतींवर आधारित आहे, त्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)