पावसात भिजल्यामुळे बंद झाला फोन, तर तो पुन्हा कसा सुरू करायचा, फॉलो करा या टिप्स


सध्या देशभरात मॉन्सून दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत जर पावसात बाहेर गेल्याने तुमचा स्मार्टफोन भिजत असेल, तर तुम्ही काही खास टिप्स फॉलो कराव्यात. तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्यास, तुमचा बंद पडलेला स्मार्टफोन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन कोरडा करा
स्मार्टफोन ओला झाल्यावर बंद झाला असेल, तर सर्वप्रथम स्मार्टफोनला पूर्णपणे कोरडा करा. त्याचप्रमाणे स्मार्टफोनमधून बॅटरी काढता येत असेल तर फोनची बॅटरी काढा. सिम कार्ड आणि मायक्रोएसडी कार्ड देखील काढा. यानंतर फोन स्वच्छ कापडाने पुसून हवेशीर असलेल्या कोरड्या जागी ठेवावा.

तांदळाच्या पिशवीत ठेवा
दुसरा उपाय म्हणजे तुमचा स्मार्टफोन तांदळाच्या पिशवीत ठेवा. तांदूळ तुमच्या फोनमधील ओलावा शोषून घेतो. यामुळे तुमचा स्मार्टफोन रीस्टार्ट होतो.

बॅटरी चार्ज करा
तुमचा स्मार्टफोन कोरडा झाल्यावर तुम्ही तो चार्ज करावा. ते तुमच्या मूळ चार्जरशी कनेक्ट करा आणि चार्जिंग पॉइंटमध्ये प्लग करा. लक्षात ठेवा की चार्जर आणि चार्जिंग पॉइंट सुरक्षित असणे आवश्यक आहे.

काय करू नये
जर स्मार्टफोन ओला झाल्यामुळे बंद झाला असेल, तर ते सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नका, कारण जास्त गरम झाल्याने स्मार्टफोन खराब होण्याचा धोका वाढतो.

ओला स्मार्टफोन चार्ज करू नका. अन्यथा, स्मार्टफोनमधील ओलाव्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.

टीप – या सर्व टिप्स फॉलो केल्यानंतर स्मार्टफोन चालू होत नसेल तर स्मार्टफोन रिपेअरिंग करणाऱ्याला दाखवा.