थिएटरमधील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, GST कौन्सिलच्या बैठकीनंतर करमुक्त होऊ शकतात या गोष्टी


सिनेमा पाहताना तुम्हीही पॉपकॉर्न किंवा स्वीटकॉर्न खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते. वास्तविक, जीएसटी कौन्सिलची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत जीएसटी कमी करण्यासाठी काही गोष्टींवर विचार केला जाऊ शकतो. त्यातलाच एक सिनेमा हॉलमधील खाद्यपदार्थ. आम्ही तुम्हाला सांगतो की, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत औषधे, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, सिनेमा हॉलमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अनेक गोष्टींवरील जीएसटी कमी केला जाऊ शकतो.

खरं तर, 11 जुलै रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सध्याचा जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यावर विचार केला जाऊ शकतो. या कल्पनेला मान्यता मिळाल्यास सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि औषधे स्वस्त होतील.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत, फिटमेंट कमिटीने सिनेमा हॉलमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेस्टॉरंट्सप्रमाणेच सिनेमा हॉलमधील खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारला जावा, असे फिटमेंट कमिटीचे मत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची तिकिटे आणि खाद्यपदार्थ पॅकेजमध्ये खरेदी केल्यास त्यांच्यावरही सिनेमाच्या तिकिटांवर लागू असलेला जीएसटी लागू होईल.

पण जर तिकिटासह खाद्यपदार्थ पॅकेजमध्ये घेतले जात नसतील, तर त्यावर 5 टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव फिटमेंट कमिटीने ठेवला आहे.

स्वस्त होऊ शकतात या गोष्टी

  • कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशातून आयात केलेले डिनुटक्सिमॅब/कर्जिबा औषध जीएसटी मुक्त केले जाऊ शकते.
  • विशेष वैद्यकीय गरजा आणि उपचारांसाठी आयात केलेल्या खाद्यपदार्थ आणि औषधांनाही जीएसटीमधून सूट मिळू शकते.
  • नॉन फ्राइड स्नॅक्सवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी केला जाऊ शकतो.
  • खाजगी संस्थांद्वारे उपग्रह प्रक्षेपणावर देखील जीएसटीमधून सूट मिळू शकते.