मॅकडोनाल्ड बर्गरमधून टोमॅटो गायब, कस्टमर केअरने ऑर्डर घेण्यास दिला नकार


देशात मान्सून सुरू झाल्याने भाज्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून विशेषत: टोमॅटोचे भाव सर्वाधिक वाढले आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचा भाव 150 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही, तर रेस्टॉरंटवरही होत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या आवडत्या बर्गर आउटलेट मॅकडोनाल्डने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे तुमच्या बर्गरची चवच बिघडली आहे. रेस्टॉरंटच्या बर्गरमधून आता टोमॅटो गायब झाले आहेत.

मॅकडोनाल्ड म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आणि आमचे सर्व प्रयत्न करूनही आम्हाला चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळत नाहीत. म्हणूनच आमच्या काही आउटलेटवर टोमॅटो खाद्यपदार्थात उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती कायमस्वरूपी नाही. त्याच्या उच्च किंमतीमुळे, टोमॅटो भारतातील (उत्तर आणि पूर्व) काही मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्समधील मेनूमधून गायब झाला आहे. हवामानातील बदलामुळे दर्जेदार टोमॅटो बाजारात उपलब्ध होत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणूनच आम्ही टोमॅटो वापरणे बंद केले आहे.

जेव्हा अर्चना नावाच्या ग्राहकाने मॅकडोनाल्डच्या कस्टमर केअरला फोन करून टोमॅटो बर्गरची ऑर्डर दिली. तर मॅकडोनाल्डच्या कस्टमर केअरकडून उत्तर आले की, सध्या आम्ही बर्गरमध्ये टोमॅटो वापरत नाही. सध्या फक्त टोमॅटोशिवाय बर्गरच्या ऑर्डर दिल्या जात आहेत.

काही काळापर्यंत टोमॅटो पिकाचा खर्चही शेतकऱ्यांना मिळत नव्हता. अशा परिस्थितीत नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वत:चे पीक उद्ध्वस्त केले होते. परिस्थिती अशी होती की, मे महिन्यात टोमॅटोचे दर नाशिक, महाराष्ट्रात 1 रुपये किलोपर्यंत घसरले होते. मात्र आता त्याची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. देशात यंदा मान्सूनला उशीर झाला. मात्र नंतर अचानक पावसाने वेग घेतला. त्यामुळे त्याचा परिणाम पिकावर दिसू लागला असून अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे.

देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटला आहे. या सर्व कारणांमुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. ही वाढ तात्पुरती असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यावर टोमॅटोचे भाव पुन्हा जुन्या पातळीवर येतील.