Balaji Amines Success Story : 40 वर्षांपूर्वी या व्यक्तीने 25 हजार रुपयांचे कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय, जाणून घ्या कशी उभी केली 7500 कोटींची कंपनी


72 वर्षांचे ए प्रताप रेड्डी यांना परिचयाची गरज नाही. तेलंगणातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मात्र यामागे त्यांचा मोठा संघर्ष आहे. जर त्यांनी 40 वर्षांपूर्वी कर्ज घेण्याची जोखीम घेतली नसती, तर कदाचित ते आज जिथे आहे, तिथे पोहोचू शकले नसते. बँकेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी कंपनी सुरू केली.

सध्या ए प्रताप रेड्डी 7,500 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली बालाजी अमाईन्स ही कंपनी चालवतात. रेड्डी यांनी एक यशस्वी उद्योगपती होण्यासाठी अत्यंत संयमाने काम केले आणि प्रतिकूल परिस्थितीतही हिंमत हारली नाही. आज ब्रँड स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ए. प्रताप रेड्डी यांनी यशस्वी उद्योजक बनण्याचा प्रवास कसा केला.

प्रताप रेड्डी यांचे बालपण गरिबीत गेले. यामुळे त्यांना सर्व अडचणींवर मात करून जगात नाव कमावण्याची प्रेरणा मिळाली. रेड्डी यांना दररोज 10 किलोमीटर चालत शाळेत जावे लागत होते. पण त्यांनी हिंमत न गमावता जगात नाव कमावण्याचा संकल्प केला.

ए प्रताप रेड्डी यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे होते. यासाठी त्यांनी 40 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षी व्यावसायिक जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक छोट्या व्यवसायात त्यांनी हात आजमावला. यानंतर त्यांनी मोठा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि केमिकल व्यवसायात उतरले. 1988 मध्ये रेड्डी यांनी बालाजी अमाईन्स ही केमिकल कंपनी सुरू केली.

केमिकल कंपनी उघडण्यासाठी त्यांनी लहान व्यवसाय करून कमावलेली 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि यशाच्या पायऱ्या चढत राहिले. त्यांनी रेड्डीज बालाजी अमाईन्सला जगातील आघाडीच्या रासायनिक कंपन्यांमध्ये स्थान मिळवून दिले.

रेड्डीज बालाजी केमिकल्समध्ये सध्या 12 औद्योगिक युनिट्स आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर हे त्याच्या यशाचे रहस्य आहे. विदेशी तंत्रज्ञानाऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी रासायनिक उद्योगात खळबळ माजवली. यामुळे त्यांना किमती मोठ्या प्रमाणात खाली आणण्यास मदत झाली. एक चतुर्थांश किंमत कमी करून त्यांनी स्पर्धकांना तगडी टक्कर दिली.

सध्या बालाजी अमाइन्स ही भारतातील सर्वात मोठी मिथिलामाइन उत्पादक कंपनी आहे ज्यामध्ये जवळपास 60% मार्केट शेअर आहे. रेड्डीज कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2,300 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. जे कंपनीकडे बाजारात काय आहे ते सांगते.

बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत ए प्रताप रेड्डी म्हणाले की, ते अजूनही जोखीम घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे की व्यवसायात जोखीम घेणे हा एक शाश्वत आणि वाढ निर्धारीत व्यवसायाचा एक महत्त्वाचा घटक आहे.