रोहित शर्माची T20 कारकीर्द संपली का? विराट कोहली भारताकडून टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाही का? भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज स्टार्सनी त्यांचे शेवटचा T20 सामना खेळला आहे का? हे सर्व प्रश्न विचारण्यामागचे कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आलेल्या संघात या दोघांची नावे नाहीत आणि, हे पहिल्यांदाच घडले नसून, सलग चौथ्या टी-20 मालिकेतील हे वास्तव आहे.
Rohit-Virat Career : रोहित शर्मा आणि विराट कोहलीची T20 कारकीर्द संपुष्टात, सलग चौथ्या मालिकेत मिळाला मोठा इशारा!
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. दोघेही तेथे प्रथम कसोटी आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. पण येथे 5 जुलैला वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली, तेव्हा त्यात ना रोहितचे नाव होते ना विराटचे. अशा परिस्थितीत रोहितकडून टी-20 कर्णधारपद तसेच खेळाडू म्हणून या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. T20 विश्वचषक 2024 डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ व्यवस्थापन रोहित-विराटच्या पलीकडे पाहत आहे का?
प्रत्येक टी-20 मालिकेनंतर पाहायला मिळणारा भारतीय संघ पाहून सध्यातरी असेच वाटते. रोहित-विराटची टी-20साठी निवड न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. T20 विश्वचषक 2022 पासून, सलग चौथ्या मालिकेत हे घडले आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 संघात स्थान न मिळण्यापूर्वी रोहित-विराटला गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यासाठीही टी-20 संघाबाहेर ठेवण्यात आले होते. यानंतर जेव्हा टीम इंडियाची या वर्षी श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या होम टी-20 मालिकेसाठी निवड झाली, तेव्हा त्यावेळीही रोहित-विराटचे नाव गायब राहिले. आता हे पुन्हा पुन्हा घडल्यावर प्रश्न निर्माण होतील आणि दोघांची टी-20 कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि, नेमके तसेच होत आहे.
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आपला शेवटचा टी-20 सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.