कार्तिक कियाराची जोडी पुन्हा एकदा हिट ठरत आहे. ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटानंतर या दोघांची प्रेमकहाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. कार्तिक-कियारा यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला होता. ईदला प्रदर्शित झाल्याचा फायदा या चित्रपटाला मिळाला आणि आता रविवारीही चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप घेतली आहे. जाणून घ्या वीकेंडला चित्रपटाने किती कमाई केली?
BO Collection: कार्तिक-कियाराचा धुमाकूळ, रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी उसळी
बॉक्स ऑफिसवर कार्तिक-कियारा यांची जादुई केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चांगली कमाई केली असली तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत कमालीची झेप घेतली आहे. सकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘सत्यप्रेम’च्या कथेने 2 जुलै म्हणजेच रविवारी सुमारे 12 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायाचे झाले तर पहिल्या दिवशी 9.5 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये घट झाली आणि जवळपास 7 कोटींची कमाई झाली. तिसऱ्या दिवस शनिवारपासून चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला आणि कमाईला तेजी येऊ लागली. शनिवारी या चित्रपटाने 10.10 कोटींची कमाई केली.
सत्यप्रेम की कथा कार्तिकच्या कारकिर्दीतील तिसरा मोठा हिट चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 38.35 कोटींचे ग्रॅंड कलेक्शन केले आहे. याआधी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. मात्र, सत्यप्रेम की कथा रिलीज होण्यापूर्वी कार्तिक आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट शेहजादा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.