Ajit Pawar revolt : 20 वर्षांपुर्वी जेव्हा अजित पवारांनी उघडपणे केली होती बंडखोरी


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी रविवारी चार वर्षांत तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 63 वर्षीय अजित पवार यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. सर्वोच्च पदावर राहण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. 2019 नंतर काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधीही त्यांनी 20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उघडपणे बंड केले होते. चला जाणून घ्या काय होते ते संपूर्ण प्रकरण? ज्युनियर पवारांना शरद पवारांची कोणती गोष्ट आवडली नव्हती?

2004 मध्ये अजित पवार यांनी केली होती बंडखोरी
सातवेळा आमदार राहिलेल्या अजित पवार यांच्याकडे शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. 2004 मध्ये त्यांचे आणि शरद पवार यांच्यातील संबंध पहिल्यांदाच बिघडले. 2004 मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त जिंकल्या होत्या. असे असतानाही शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अजित पवारांच्या त्यावेळच्या सहाय्यकाने सांगितले की, त्यावेळी अजित यांना वाटले की हे सर्व आपल्याला बाजूला करण्यासाठी केले जात आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे काका हे सर्व करत आहेत. काका-पुतण्यामध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ होती.

सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अधिक तीव्र झाला संघर्ष
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी 2006 मध्ये राजकारणात प्रवेश केला, तेव्हा हा संघर्ष अधिक तीव्र झाला. 2009 मध्ये अजित पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हायचे होते. पण काका शरद पवार यांनी पक्षाचे दुसरे नेते छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत जास्त आमदार असतानाही. त्यावेळी काका शरद पवार यांच्या निर्णयाचा त्यांनी उघडपणे निषेध केला होता. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री न केल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती.

या प्रकाराने राष्ट्रवादीत तेढ निर्माण झाली. मात्र, नंतर काका-पुतण्यामध्ये समेट झाला आणि प्रकरण इथेच संपले. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 15 वर्षे राज्य केले.

2010 मध्ये पहिल्यांदा बनले उपमुख्यमंत्री
2009 मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होऊ शकले नसले, तरी 2010 मध्ये ते पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, 2012 मध्ये त्यांचे नाव सिंचन घोटाळ्यात आल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. पण काही महिन्यांतच ते सरकारकडे परतले. सरकारने केलेल्या तपासात ते निर्दोष निघाले आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थसाठी लॉबिंग केले, परंतु मावळमधून पार्थचा पराभव हा मोठा धक्का मानला गेला, ज्यामुळे कुटुंबातील कटुता वाढली. त्यानंतर 2019 मध्ये अजित यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार 80 तास चालले. बंड दडपण्यात शरद पवार यशस्वी झाले. त्यावेळी अजित पवार स्वगृही परतले. पण शरद पवारांनी नुकतीच सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यावर अजित पवारांकडे दुर्लक्ष झाल्याने ते अधिकच नाराज झाले.