मधुमेहाच्या उपचारात वापरण्यात येणारे औषध Semaglutide हे वजन कमी करण्यासाठी जादूच्या गोळीपेक्षा कमी नाही. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, यामुळे दारूचे व्यसनही सुटू शकते. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला असून, त्यानुसार वारंवार दारू पिण्याचे व्यसन नियंत्रित केले जाऊ शकते.
Research : मधुमेहाच्या औषधाने आटोक्यात येईल वारंवार दारू पिण्याचे व्यसन !
गोटेनबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास eBioMedicine या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनात उंदरांच्या एका गटाला दारू पिण्याची सवय लागावी म्हणून त्यांना नऊ आठवडे दारू देण्यात आली. जेव्हा उंदरांना याची सवय झाली, तेव्हा संशोधकांनी त्यांना सेमॅग्लुटाइड दिले आणि नंतर अल्कोहोलच्या सेवनावर त्याचा परिणाम मोजला.
या संशोधनाचे लेखक प्रा. एलिझाबेथ जार्लहॉग यांनी असे मत नोंदवले की जेव्हा सेमॅग्लुटाइड एक किंवा अधिक वेळा दिले जाते, तेव्हा नर आणि मादी उंदरांमध्ये अल्कोहोलचे व्यसन कमी होते.
दारूचे व्यसन कमी करू शकते Semaglutide
यानंतर संशोधकांनी नऊ दिवस उंदरांना दारू दिली नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की या औषधाच्या परिणामानंतर त्यांना पुन्हा दारूचे व्यसन लागले की नाही हे शोधण्यासाठी त्यांनी पुन्हा चाचणी केली. मात्र, उंदरांनी पुन्हा दारू प्यायली नाही. संशोधकांच्या मते सेमॅग्लुटाइड पुन्हा दारूचे व्यसन रोखू शकते.
आवश्यक आहे मानवांवर चाचणी
मात्र, या औषधाची मानवांवर चाचणी आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भूक कमी करण्याव्यतिरिक्त, सेमॅग्लुटाइड मेंदूतील बायोकेमिस्ट्री देखील बदलते, ज्यामुळे अल्कोहोलचे व्यसन कमी होते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, साखरेचे व्यसन त्यांच्या यकृत आणि मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते, त्यामुळे सेमॅग्लुटाइड हे आगामी काळात प्रभावी औषध म्हणून काम करू शकते.
काय आहे semaglutide
Semaglutide साखर नियंत्रित करते तसेच बीटा पेशी सक्रिय करते. पूर्वी ते फक्त इन्सुलिन इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध होते, पण आता ते गोळ्यांच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.