June 2023 Deadlines : पॅन-आधार लिंक करण्यापासून ते अॅडव्हान्स टॅक्सपर्यंत, आजच करा ही 3 महत्त्वाची कामे, अन्यथा तुम्हाला करावा लागेल पश्चात्ताप


जर तुम्हाला ही महत्त्वाची कामे अद्यापपर्यंत पूर्ण करता आली नसतील, तर ही 3 कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक दिवसाचा वेळ आहे. कारण 30 जूननंतर तुम्ही या गोष्टी करू शकणार नाही. तुम्हालाही ही कामे करायची असतील, तर त्यासाठी मोठा दंड भरावा लागेल. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. अशी अनेक कामे आहेत ज्यांच्या निकालाची अंतिम तारीख 30 जून आहे. म्हणूनच या गोष्टी आजच आवर्जुन करून घ्या.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळायचा असेल, तर त्यांना त्वरित सामोरे जा. यामध्ये आधार-पॅन लिंकपासून बँक लॉकर करारापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे मार्गी लावण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे हे काम आजच पूर्ण व्हायला हवे.

पॅनशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून म्हणजेच आज आहे. जर तुम्ही ही दोन कागदपत्रे लिंक केली नाहीत, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरताना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी, आजच लिंक करुन घ्या. यापूर्वी पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती.

ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करारनामा जमा केला असेल, तर तुम्हाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची आग किंवा चोरी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत आरबीआयने नवीन धोरण तयार केले आहे. जर ग्राहकांनी बँक लॉकरच्या नवीन करारावर स्वाक्षरी केली नाही, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेशी संबंधित नवीन नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही व्यापारी असाल किंवा नोकरी करत असाल आणि तुमचा कर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी तो विहित मुदतीत भरणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही वेळेत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर एकूण अॅडव्हान्स टॅक्सच्या रकमेवर पहिल्या तीन हप्त्यांवर 3% आणि शेवटच्या हप्त्यावर 1% व्याज द्यावे लागेल. यामुळे तुमच्या खिशावरचा भारच वाढेल. म्हणूनच या दिवशीच आगाऊ कर भरावा. अन्यथा, तुम्हाला आयकर सूचनेलाही सामोरे जावे लागू शकते.