IPL 2023 मध्ये हॉटेलमधून गायब होणारे ते चार खेळाडू कोण? म्हणूनच टीम इंडियात झाली नाही निवड!


भारताच्या चार युवा खेळाडूंना बीसीसीआयकडून शिक्षा होणार आहे. मोठी बातमी म्हणजे या चार खेळाडूंनी आयपीएल 2023 दरम्यान संघाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. हे खेळाडू टीम ज्या हॉटेलमध्ये राहत होती त्यातून परवानगी न घेता गायब व्हायचे. त्यानंतर आयपीएल टीमने त्याच्याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली.

हे चारही खेळाडू आयपीएलच्या उत्तर भारतीय फ्रँचायझीचे खेळाडू असल्याचेही अहवालात समोर आले आहे. उत्तर भारत फ्रँचायझी म्हणजे चारही खेळाडू लखनौ सुपरजायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स किंवा राजस्थान रॉयल्सचे आहेत.

खुद्द उत्तर भारतातील फ्रँचायझीच्या मालकाने खुलासा केला आहे की, त्यांच्या खेळाडूंनी आयपीएलदरम्यान चार वेळा आचारसंहिता मोडली होती.

क्रिकबझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या एकदिवसीय आणि कसोटी संघात केवळ कामगिरीच नव्हे नाही, तर खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वर्तनासाठीही एक मापदंड ठेवण्यात आला आहे.

कदाचित त्यामुळेच काही खेळाडूंची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली नाही. मात्र, त्या खेळाडूंची नावे वेस्ट इंडिज टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहेत. कारण बीसीसीआय या बाबतीत ज्या प्रकारची कठोरता पाळते ते पाहता दोषी खेळाडूंना वेस्ट इंडिजच्या टी-20 मालिकेतही खेळणे कठीण असल्याचे दिसते.