फक्त 2 दिवस शिल्लक.. मग रद्दी होणार तुमचे पॅन कार्ड! आजच ऑनलाईन लिंक करा पॅन-आधार


आजच्या काळात पॅन आणि आधार हे दोन आवश्यक कागदपत्रे आहेत. सरकारने ही दोन्ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही अद्याप आधारशी पॅन लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्दी होईल. यानंतर तुम्हाला हवे असले तरी आधार कार्डसोबत पॅन लिंक करता येणार नाही. आता 30 जून 2023 पर्यंत वापरकर्ते 1000 रुपयांचा दंड भरून आधार कार्डसोबत पॅन लिंक करू शकतात.

याप्रमाणे पॅन आधार लिंक स्टेटस तपासा
पण सर्वात आधी प्रश्न येतो की तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? वापरकर्ते 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून त्यांचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे तपासू शकतात. याशिवाय, आयकर विभागाच्या Incometax.gov.in/iec/foportal/ येथे ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन पॅन आधार लिंकची स्थिती ऑनलाइन तपासली जाऊ शकते.

पॅन आधार ऑनलाइन लिंक करण्यासाठी

  • सर्वप्रथम तुम्हाला https://incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर खाते लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर पॅन आधार लिंकचा पॉपअप मेसेज येईल किंवा प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन आधार लिंक पर्यायावर क्लिक करा.
  • आता पॅनवर नोंदवलेली जन्मतारीख आणि लिंग यांचा तपशील दिसेल. ते आधार कार्डच्या तपशीलाशी जुळले पाहिजे.
  • तपशील जुळल्यानंतर वापरकर्त्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आता लिंक बटणावर क्लिक करा.
  • यानंतर पॉपअप मेसेजवरून कळेल की पॅन आधार कार्डशी लिंक झाला आहे.

एसएमएसद्वारे पॅन आधारशी लिंक करण्यासाठी

  • प्रथम 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका.
  • त्यानंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.